जि. प. शाळेच्या वर्गखोल्या, रस्ता, सभामंडपाचा प्रश्न मार्गी लागणार:आमदार जाधव यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
कन्नड तालुक्यातील नागापूर येथे आमदार संजना जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी सुमारे ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत पायाभूत सुविधा योजनेतून जिल्हा परिषद शाळेसाठी २५ लाख रुपयांच्या निधीतून दोन नवीन वर्गखोल्या, वसंतराव नाईक तांडा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या रस्त्याचे काम, तसेच संत सावता माळी समाज सभामंडपासाठी २५ लाख रुपयांचा…