Headlines

कारसुळची पीएमश्री शाळा ठरतेय शैक्षणिकदृष्ट्या आदर्श:डिजिटल सुविधा, स्वच्छतेसह विविध उपक्रमांचे गटविकास अधिकाऱ्यांकडून कौतुक‎

आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लिश डिजिटल प्राथमिक शाळेला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. शाळेचा . कारसुळची शाळा तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या आदर्श ठरत असल्याचे नमूद करत जगताप यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान,…

Read More

बालिकागृहात 2 मुलींनी मैत्रिणीला बुडवून मारले:मथुरेत रडण्याचे केले नाटक, पकडल्यावर म्हणाल्या- घरी जायचे होते, म्हणून मारले

मथुरा येथील वृंदावनमधील शासकीय बालिका गृहात 2 अल्पवयीन मुलींनी आपल्या एका 14 वर्षीय मैत्रिणीला बाथरूममध्ये बुडवून मारले. पोलिसांनुसार, दोघींना बालिका गृहातून बाहेर पडायचे होते. त्यांना वाटले की, कोणाचा मृत्यू झाल्यास बालिका गृह बंद होऊ शकते आणि सर्व मुलींना घरी पाठवले जाईल. घटनेनंतर पोलीस पोहोचले तेव्हा आरोपी मुली रडण्याचे नाटक करू लागल्या. त्यांनी गोंधळ सुरू केला….

Read More

अंधश्रद्धा, जातिभेदावर तुकारामांचा परखड प्रहार:माेहाडी येथील गाेपालकृष्ण व्याख्यानमालेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन‎

संत तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर परखड प्रहार करत अभंगांतून समता, माणुसकी आणि विवेकाचा संदेश दिला. त्यामुळे ते केवळ भक्तीपरंपरेतील संत नव्हे, तर समाजपरिवर्तनाची क्रांती घडविणारे क्रांतिकारक संत होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले. तालुक्यातील मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित आणि कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशनच्या संयोजनाने…

Read More

रेसिंगमध्ये अभिनेता अजित कुमारच्या कारला अपघात:शर्यतीत नियंत्रण सुटून दुसऱ्या गाडीला धडकली कार, सुखरूप बचावले

साउथ फिल्म अभिनेता तथा कार रेसर अजित कुमार युरोपमधील एका हाय-स्पीड एंड्युरन्स शर्यतीत अपघाताला बळी पडले. शर्यतीत त्यांची कार अनियंत्रित होऊन दुसऱ्या गाडीला धडकली. मात्र, या दुर्घटनेत त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. फिल्मीबीटच्या वृत्तानुसार, हा अपघात एशियन ला मॅन्स सिरीज आणि मिशेलिन ला मॅन्स कपच्या रेसिंग इव्हेंटमध्ये झाला. अजित कुमार…

Read More

मन:शांतीसाठी प्रत्येकाने स्वीकारावा परमार्थ मार्ग:मानुर येथे सप्ताहात राजराजेश्वरी दीदींचे निरुपण‎

परमेश्वराच्या दर्शनाने मनाची चंचलता संपून ते चरणी स्थिरावते. जगातील सुख-दुःख, भूक-तहान यांचा विसर पडतो आणि अहंकार नष्ट होतो. त्यामुळे नागरिकांनी संसारासोबत परमार्थाची जोड द्यावी, असा संदेश राजराजेश्वरी दीदी बिलमाळ यांनी कीर्तनातून दिला. तालुक्यातील मानूर येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहात राजराजेश्वरी दीदी यांनी पाचवे पुष्प गुंफले. आजची सेवा लता पवार, कडू पवार यांच्या वतीने…

Read More

भराडीच्या ज्ञानविकास विद्यालयात भारतीय वायुदलातील संधींवर ऑनलाइन मार्गदर्शन:पुण्याच्या लोहेगाव एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद‎

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, साहस आणि जबाबदारीची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांना भारतीय वायुदलातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात भारतीय वायुदलातील करिअरच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्श . या ऑनलाईन सत्रात लोहेगाव (पुणे) एअर फोर्स स्टेशनच्या फ्लाईंग ऑफिसर मुस्कान सिंह (फ्लायंग पायलट) आणि मास्टर वॉरंट ऑफिसर देवेश कुमार (एज्युकेशन इन्स्ट्रक्टर) यांनी…

Read More

एमपीच्या 14 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट:बिहारमध्ये गंगा दुथडी भरून वाहत आहे, यूपीच्या 19 जिल्ह्यांत पूर; हिमाचलमध्ये 125 रस्ते बंद

मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागात मान्सून ट्रफ सक्रिय झाल्यामुळे रविवारी जबलपूर, चंबळ आणि नर्मदापुरम विभागांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने 14 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 24 ऑगस्टपर्यंत पावसाची क्रिया मध्य आणि पश्चिम मध्य प्रदेशाकडे सरकण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच, येत्या काही दिवसांत पावसाचा प्रभाव राज्याच्या इतर भागांमध्येही वाढू शकतो. उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे राज्यातील नद्या…

Read More

खुलताबाद उरुसामध्ये कुस्तीचा थरार:291 पहिलवानांनी गाजवला आखाडा

ऐतिहासिक खुलताबादच्या उरुसाचे औचित्य साधून रविवारी आयोजित कुस्ती स्पर्धेत कुस्त्यांची पर्वणी पहायला मिळाली. दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या आखाड्यात परिसरासह जिल्ह्यातून आलेल्या तब्बल २९१ लहान-मोठ्या पहिलवानांनी आपले नशीब आजमावले. स्पर्धेतील सर्वात मानाची आणि थरारक ठरलेली ११ हजार रुपयांची शेवटची कुस्ती सराईचे पहिलवान मुन्ना बाळासाहेब नागे यांनी जिंकली. त्यांनी शिरसळतांड्याचे (सिल्लोड) पहिलवान दीपक…

Read More

श्री संत शंकरस्वामी महाराज सप्ताहाच्या सांगतेला 101 क्विंटल साखरेचा प्रसाद:खंडाळा येथे 10 मिनिटांत 1 लाख भाविकांना वाटपाचे नियोजन‎

श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा २८१ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडाळा येथे भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता मंगळवारी होणार आहे. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण खंडाळा परिसराला…

Read More

टोलनाक्यावर वाद सोडवण्यास आलेल्या‎पोलिस कर्मचाऱ्यास तरुणांकडून मारहाण‎:माळीवाडी टोलनाक्यावरील घटना, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

टोलनाक्यावर वाद झाल्याची माहिती ११२ या क्रमांकावर मिळाली होती. त्या ठिकाणी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना अंबड तालुक्यातील माळीवाडी टोलनाक्यावर २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आसिफ कय्युम शेख (पाचोड) याच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा दाखल आहे. अंमलदार पवन बळीराम चव्हाण (३२) यांनी अंबड ठाण्यात तक्रार दिली आहे. टोलनाका परिसरात ५० ते…

Read More