चिंता वाढली:पावसाची दडी; पिके करपण्याच्या मार्गावर, उत्पादनात घटीची भीती, विहीर-बोअरच्या पाण्यावर पिके वाचवण्याची शेतकऱ्यांचंी धडपड
श्रीगोंदे तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पेरणीनंतर काही काळ समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी, बोअर तसेच उपलब्ध पाणीस्रोतांचा आधार घेत असले तरी मर्यादित पाणीसाठ्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी…