Headlines

मतदार यादीचा एसआयआर संपला, प्रारूप यादी आज जाहीर:उद्यापासून नवीन मतदारांची नोंदणी सुरू, महिनाभर प्रक्रिया चालेल

भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम पूर्ण झाला आहे. या आधारे तयार झालेली नवीन प्रारूप मतदार यादी आज, सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. या यादीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी, १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक मानून, नवीन मतदारांच्या नोंदणीला मंगळवार, १ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ही नोंदणी प्रक्रिया पुढील महिनाभर सुरू…

Read More

मनोज जरांगे काही चुकीचे मागत नाहीत:शिक्षण आणि रोजगार दिला असता तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजातील…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:व्याजाच्या पैशांसाठी तगादा; सहा खासगी सावकारांविरोधात गुन्हा

मसाल्याच्या व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवरून वाढीव व्याजाची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अशोक सुतार (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुतार यांनी 19 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत व्यवसायासाठी सुरेश सावंत (शाहूपुरी), अक्षय दळवी…

Read More

Mohit Kamboj Warns Legal Action Against Social Media Defamation

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाणीवपूर्वक चालवल्या जाणाऱ्या बदनामीकारक मोहिमेविरोधात व्यावसायिक मोहित कंबोज भारतीय यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपली सामाजिक आणि सार्वजनिक प्रतिष्ठा मलीन करण्याच्या हेतूने तथ्यहीन, बनावट आणि दिशाभूल करणाऱ् . गेल्या काही दिवसांपासून डिजिटल माध्यमांवर एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून आपल्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याचे कंबोज यांनी नमूद केले. वैयक्तिक आकसापोटी आणि…

Read More

एक-दोन दिवसांत मनोज जरांगेंना भेटणार:पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, मंत्री उदय सामंतांचे मोठे विधान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत असून, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः जरांगे यांच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या एक-दोन…

Read More

हृदयद्रावक घटना!:आई-वडिलांसह फिरायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी जवळील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारच्या सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच घरातील दोन मुलांचा अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार येथे वास्तव्याला असलेले रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे पत्नी,…

Read More

गो मातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:पाच कोटी जनता 1 डिसेंबर रोजी मुंबईत येणार, गोपालनंद सरस्वती महाराज यांची माहिती

राष्ट्राची रक्षा करण्यासाठी गोमातेची सेवा करणे व गोवंश वाचविणे आवश्यक आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा व इतर मागण्यासाठी गो सम्मान अभियान अंतर्गत येत्या एक डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्यात पाच कोटी अकरा लाख गोभक्त देशभरातून मुंबईला जाऊन कोट्यावधी गोसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्य सरकारला देणार असल्याची माहिती गोपालनंद सरस्वती महाराज यांनी रविवारी ता. 30 हिंगोली येथे दिली. हिंगोली…

Read More

सामंथा प्रभूने शेअर केले बेबी बंपचे फोटो:प्रेग्नन्सी ग्लोमध्ये सेल्फीही पोस्ट केली; चाहत्यांनी बाळाचे नाव सुचवले, अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या प्रेग्नेंसी ब्रेकवर आहे. ती सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसी प्रवासाचे फोटो सतत शेअर करत आहे. नुकतेच सामंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन फोटो डंप शेअर केला आहे, ज्यात ती तिचा बेबी बंप आणि प्रेग्नेंसी ग्लो दाखवताना दिसत आहे. या पोस्टवर एका चाहत्याने तिला बाळाच्या नावासाठी सूचना दिली, ज्यावर अभिनेत्रीने मजेशीर…

Read More

अस्सल पैठणी ओळखण्यासाठी आता येणार बारकोड!:ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा मोठा निर्णय

पैठणी म्हणजे महिलांचे सौंदर्य खुलवणारा आणि सण-समारंभांमध्ये विशेष क्रेझ असलेला पारंपरिक वस्त्रअलंकार आहे. अलीकडे ‘ओरिजनल’ पैठणीच्या नावाखाली ‘सेमी’ आणि ‘डुप्लिकेट’ पैठणी बाजारात विकून ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी आणि खऱ्या-खोट्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आता एक नवी शक्कल लढवली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना…

Read More

पुण्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक:जुलैतील 35 रुग्ण ऑगस्टमध्ये थेट 225 वर,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे शहरात स्वाइन फ्लूचा (एच1एन1) संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जुलै महिन्यात शहरात 35 रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या थेट 225 वर पोहोचली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणारी गर्दी पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला स्वाइन फ्लूचे रुग्ण फारच कमी…

Read More