कराडमध्ये अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून पोलिसांनीच केले चित्रीकरण:कारवाई न झाल्यास पीडित कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा
कराड शहर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ३ अल्पवयीन मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमधील किरकोळ मारामारीच्या चौकशीसाठी या मुलांना बोलावण्यात आले होते. मुलांच्या तक्रारीनुसार, रात्री खोलीचा दरवाजा बंद करून शिवीगाळ करत विवस्त्र करण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवल्या आणि एकमेकांच्या गुप्तांगावर मारहाण करण्यास भाग पाडले. पोलिसांनी या…