Headlines

इथेनॉल ब्लेंडिंगवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:याचिकेत मागणी – पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळले जात आहे हे पेट्रोल पंपांवर सांगावे

सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच सोमवार (31 ऑगस्ट) रोजी त्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे, ज्यात देशातील सर्व पेट्रोल पंपांच्या नोजलवर आणि पेट्रोल बिलावर इथेनॉलची नेमकी मात्रा म्हणजेच टक्केवारी लिहिण्याची मागणी करण्यात आली आहे. पीटीआय (PTI) नुसार, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. ही याचिका नरेंद्र कुमार गोस्वामी…

Read More

सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने शेती करा:मेंढोळदे येथे केळी पिकाची शेतीशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ अंतर्गत रविवारी केळी पिकाची विशेष शेतीशाळा पार पडली. या प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने केळीची शेती करण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेला गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुक्ताईनगर येथील कृषी तंत्र विद्यालयाचे पंकज…

Read More

वेरूळला दोन दिवसांमध्ये 83 हजार भाविकांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक‎

शनिवार-रविवार लागून आलेल्या शासकीय सुट्ट्या आणि श्रावणातील तिसरा सोमवार यांच्या सुरेख योगायोगामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वेरूळ येथे भाविकांचा अथांग महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत सुमारे ८३ हजारांहून अधिक शिवभक्तांनी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन धन्यता मानली, तर लाखो भाविकांनी पवित्र तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक केला. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि…

Read More

लाडगाव ते वांजरगाव रस्त्यावर कावड यात्रेच्या 20 भाविकांचा टेम्पो उलटला:4 गंभीर जखमी घाटीत, सर्वजण कन्नड तालुक्यातील औराळ्याचे रहिवासी‎

पवित्र पाणी घेऊन पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराकडे निघालेल्या भाविकांच्या कावड यात्रेला रविवारी सकाळी अपघाताचे गालबोट लागले. लाडगाव-वांजरगाव रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने नऊ भाविक जखमी झाले. त्यापैकी चौघांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. औराळा (ता. कन्नड) येथील २० भाविक वांजरगाव येथे पाणी घेण्यासाठी आले होते. तेथून हे पवित्र पाणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील…

Read More

न्यूयॉर्कमध्ये भागवतांच्या कार्यक्रमापूर्वी तिरंग्याचा अपमान:रिजिजूंचा इशारा- RSS, भाजपवर टीका करा, पण देशाचा अपमान महागात पडेल

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेर भारतीय ध्वजाच्या अपमानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रदर्शन शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर झाले होते. रिजिजू यांनी रविवारी रात्री X वर घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिले- आम्ही नेहमीच म्हटले आहे की आरएसएस, भाजप किंवा सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण आमच्या ध्वजाचा आणि…

Read More

उमराणे प्राथमिक शाळेला दीड लाखांचे साहित्य भेट:गेट-टुगेदरचा खर्च टाळून माजी विद्यार्थ्यांनी दिला स्मार्ट टीव्ही, साऊंड सिस्टीम, सीसीटीव्ही‎

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टमध्ये हजारो रुपये खर्च करतात. मात्र, या प्रथेला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत उमराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २००८-०९ च्या इयत्ता दहावीच्या ५० माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे दीड . जिल्हा शिक्षण अधिकारी ओमप्रकाश पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निधी संकलित केला. त्यातून स्मार्ट टीव्ही, साऊंड…

Read More

शेतकरी वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असावा:विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी खा. सुळे यांचे प्रतिपादन‎

‘राजकारण होत राहील, मतभेदही होतील; मात्र शेतकऱ्यांना वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. विनायकदादा पाटील यांची नाळ काळ्या मातीशी जोडलेली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. वनाधिपती विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. निफाड तालुक्याच्या राजकीय,…

Read More

चांदवडमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकतेचा संदेश:शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे‎

ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी…

Read More

श्रीकृष्णाच्या लीलांतून मोह, लोभाचा त्याग करून मानवतेने जगाचा संदेश:मानूर येथील कीर्तन सप्ताहात प्रकाश महाराज गांगुर्डे यांचे निरुपण‎

भगवान श्रीकृष्णाने विविध लीलांच्या माध्यमातून कुप्रवृत्तीचा नाश करत मानवाला संकटांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याचा आणि हसत-खेळत जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे माणसाने मोह-माया व लोभापासून दूर राहून एकमेकांना सहाय्य करणारे जीवन जगावे, असा . श्रीकृष्ण भगवंताचे स्वरूप असतानाही त्यांनी जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय जीवन जगले. अखेर त्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपालाही…

Read More

सैनिकांच्या मनगटावर विद्यार्थ्यांची राखी:जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाेहाेचल्या राख्या; नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम‎

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षिकांनी स्वहस्ते सुंदर राख्या तयार करून जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाठवल्या. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकाळीच या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा हा उपक्रम भावनिक ठरला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. ‘आपण…

Read More