निष्ठावान शिवसैनिक हाच उबाठाचा श्वास:चांदवड येथील आढावा बैठकीत माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी साधला संवाद
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने चांदवड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत बूथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) यंत्रणा सक्षम करण्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मिर्लेकर म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा…