मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. प्रकृती खालावली तरी सलाईन नाकारले उपोषणस्थळी वडीगोद्री…