विकासकामे नागरिकांसाठी; दर्जाशी तडजोड कदापि नाही:रस्ता कामाची नगरसेविका बंग यांनी केली पाहणी
शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभागातील विकासकामांना गती देतानाच कामांचा दर्जा कायम राखण्यासाठी नगरसेविका दिपाली रामनाथ बंग यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केली. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती मलनिस्सारण योजनेतर्गत सुरू असलेल्या खालचा गणपती ते मौलाना आझाद चौक रस्त्याच्या पहिल्या लेयरच्या कामाची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे…