शिवतांडव विनाशाचे नव्हे, तर नवनिर्मितीचे प्रतीक- डॉ. देव:श्रीनाथ दत्त मंदिरात ‘शिवमहिम्न स्तोत्र'' विषयावर मार्गदर्शन
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात साधनेची नितांत गरज असते. निरंतर साधनेने कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवता येते आणि भक्तीच्या साधनेने ईश्वराचा कृपाप्रसाद कायमस्वरूपी प्राप्त होतो. भगवान शंकरासारखी कामदेवाला भस्म करण्याची शक्तीही साधनेतूनच मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. वसुधा देव यांनी केले. रामदास पेठेतील श्रीनाथ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने श्रावण मासानिमित्त आयोजित ‘शिवमहिम्न स्तोत्र’ प्रवचनमालेच्या तिसऱ्या…