Headlines

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचाच पक्ष!:सुप्रिया सुळे यांचे आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; म्हणाल्या, ही लढाई फक्त पवार साहेबांची नाही, संविधान वाचवण्याची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नाव-चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली असून, पक्षावरील कायदेशीर अधिकारही त्यांचाच असल्याचा दावा सुळे यांनी केला. तसेच या प्रकरणाची सुनावणी लांबत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त…

Read More

अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा:दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या कारवाईत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामांबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 28 ते 29 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले….

Read More

एफसीआरए विधेयक जेपीसीकडे पाठवले:परदेशी निधी नियमांवरील सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला बळ

लोकसभा सचिवालयाने परदेशी योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, 2026 संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध करत ते जेपीसीकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे लोकसभेच्या या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला संसदीय पातळीवर बळ मिळाले आहे. केंद्र सरकारने हे…

Read More

विलासरावांच्या स्मृतिदिनी रितेश भावुक:म्हणाला – तुम्हाला जावून 14 वर्ष झाली, माझा वनवास काही संपला नाही!

महाराष्ट्रातल्या राजकारणातला अजातशत्रू, फर्डा वक्ता अशी ओळख असणारे राजबिंडे व्यक्तिमत्व म्हणजे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख. त्यांचा आज स्मृतिदिन. विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने अतिशय भावुक होत आपल्या बाबांच्या आठवणी जागवल्यात. रितेश यांनी विलासरावांसोबतच्या फोटोसह एक पोस्ट केली. त्यात फक्त एकच अतिशय हृदयस्पर्शी ओळ लिहिलीय. ‘तुम्हाला जाऊन 14 वर्ष झाली, माझा…

Read More

संभाजीनगरातील दौलताबादमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत:2 कुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याचे लचके तोडले, हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलाचा दोन मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठलाग करून कुत्र्यांचा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लहान मुलगा घराबाहेर रस्त्यावर असताना हा भयंकर प्रकार घडला….

Read More

जुलैमध्ये घाऊक महागाई किंचित घटली:WPI महागाई जूनमधील 9.87% वरून 9.78% पर्यंत कमी झाली, सरकारी आकडेवारीतून माहिती समोर

जुलैमध्ये घाऊक महागाई दर किंचित कमी होऊन 9.78% झाला. एक महिन्यापूर्वी जूनमध्ये WPI महागाई दर 9.87% होता. जुलैचा दर जूनच्या तुलनेत 0.09% कमी राहिला. घाऊक महागाईचे 4 भाग प्राथमिक वस्तू, ज्यांचे वजन 22.62% आहे. इंधन आणि ऊर्जाचे वजन 13.15% आणि उत्पादित वस्तूंचे वजन सर्वाधिक 64.23% आहे. प्राथमिक वस्तूंचेही चार भाग आहेत. घाऊक किंमत निर्देशांक (WPI)…

Read More

चाकण औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी सीईओ, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी:प्रलंबित रस्ते, वाहतूक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि वाहतूक सुविधांच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या पाहणीदरम्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि अपूर्ण काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशवाहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले….

Read More

संघ मुख्यालयात आज ध्वजारोहण सोहळा:सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघ मुख्यालय असलेल्या महाल येथील डॉ. हेडगेवार भवन येथे आज, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यासोबतच, रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीनेही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात…

Read More

जय हिंद इंडस्ट्रीजची 600 कोटींची गुंतवणूक:ई-व्हायकल्स अन् ॲल्युमिनियम कास्टिंगचे उत्पादन वाढणार

फिरोदिया समूहातील जय हिंद इंडस्ट्रीजने पुणे आणि चेन्नई येथील उत्पादन प्रकल्पांच्या विस्तारासाठी पुढील दोन वर्षांत 600 कोटी रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक आर्थिक वर्ष 2026-27 ते 2027-28 या कालावधीत केली जाईल. यापूर्वी जाहीर केलेल्या 200 कोटी रुपयांव्यतिरिक्त आता 400 कोटी रुपयांची भर पडल्याने एकूण नियोजित गुंतवणूक 600 कोटी रुपयांवर पोहोचली आहे….

Read More

स्कायवेज एअर सर्व्हिसेसचा IPO 24 ऑगस्ट रोजी उघडेल:प्राइस बँड ₹131-₹138 निश्चित; कंपनी ₹216.78 कोटींचे कर्ज फेडेल

स्कायवेज एअर सर्व्हिसेसचा IPO 24 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. कंपनीने 131 ते 138 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदार या इश्यूमध्ये 27 ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतील. इश्यूमध्ये किमान 100 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर 100 च्या पटीत बोली वाढवता येईल. 2.88 कोटी नवीन शेअर जारी होतील, प्रमोटर्सही हिस्सा विकतील कंपनी 2,88,98,300 नवीन शेअर जारी…

Read More