भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी खाऊन टाकलं असतं:जाहीर कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचा मिश्किल टोला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारी माणसे खूप साधी आणि भोळी होती. रमेशभाऊ तीन वेळा आमदार आणि सहकार क्षेत्रात चेअरमन झाले. त्यावेळी सगळेच भोळे होते. पण मी मात्र भोळा नाही. मी जर भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला कधीच खाऊन टाकलं असतं,” असा मिश्किल टोला शिंदे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला…