नामपूरला दोधेश्वर मंदिर परिसरात सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प:हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार; 700 झाडांचे रोपण
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांत हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दोधेश्वर महादेव मंदिर परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात ७०० वृक्षांची लागवड केली. आगामी काळात ७ हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर समपातळी चर, समचर व दगडी बंधारे बांधून जलसंधारणाचे काम करण्याचा मानस राष्ट्रीय सेवा योजना विभागाने…