कॅब कंपन्या कन्फर्म बुकिंगसाठी अतिरिक्त पैसे मागू शकणार नाही:सरकारने म्हटले- ॲड ऑन आणि टिप सारखे पर्याय बंद करा, लवकर बुकिंगसाठी मेसेज मिळतो
तुम्ही कॅब सेवेतून राइड बुक करता तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स टिप किंवा ॲड-ऑनच्या नावाखाली अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. सरकारने बुधवारी रॅपिडो, ओला, उबर आणि इनड्राइव्ह यांसारख्या कॅब सेवा प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या मोबाइल ॲप्समधून अशा प्रकारची वैशिष्ट्ये (फीचर्स) त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे की, बुकिंगच्या वेळीच ग्राहकांकडून ॲडव्हान्स टिप वसूल करणे चुकीचे…