कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ:अवघ्या 7 तासांत तब्बल 130 जणांना घेतला चावा; रेल्वेस्टेशन परिसरातही प्रवाशांवर हल्ले, अनेक जखमी
कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने रविवारी नागरिकांवर हल्ला करत तब्बल 130 हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जाणारे नागरिक, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक यांनाही या कुत्र्याने लक्ष्य केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, महापालिका आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित कुत्र्याला अखेर पकडले. रेल्वे स्थानक परिसरातही…