Headlines

घाटनांद्र्याची तहान भागवणाऱ्या शेरी हाडोळ तलावाच्या सांडव्याला भगदाड:सांडव्याची दुरुस्ती, भिंतीवरील झाडाझुडपांची छाटणी करण्याची मागणी‎

घाटनांद्रा गावाची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या जोगेश्वरी रस्त्यावरील ‘शेरी हाडोळ’ लघु तलावाच्या सांडव्याला मोठे भगदाड पडल्याने या तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडवा फुटल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या सांडव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी…

Read More

नादरपूर:आमदार संजना जाधव यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन

कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध सामाजिक व विकासाभिमुख उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यादरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांचा ग्रामपंचायत नादरपूर आणि संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने गुरुवारी नागरी सत्कार करण्यात आला. आ….

Read More

पैठण:राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा

जगप्रसिद्ध पैठणीच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देत १२ वा राष्ट्रीय हातमाग दिन पैठणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बुनकर सेवा केंद्र, मुंबई यांच्या वतीने श्रीक्षेत्र नाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात पैठण तालुक्यातील पैठणी विणकर महिला मंडळाच्या सदस्यांसह शेकडो विणकर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक हातमाग कलेचा वारसा जपणाऱ्या विणकरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला….

Read More

मिरची दरात 6 रुपयांच्या तफावतीने शेतकऱ्यांचे लाखोंचे होतेय नुकसान:सिल्लोड बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मिरची बाजारात प्रतिकिलो तब्बल ६ रुपयांची दरतफावत आढळून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. व्यापाऱ्यांकडून लिलावादरम्यान जाहीर होणारे दर आणि शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पडणारा भाव यात मोठी दरी असल्याने मिरची उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. मिरचीसारख्या नगदी पिकात प्रति किलो काही रुपयांचा फरकही क्विंटलमागे शेकडो रुपयांचे, तर मोठ्या प्रमाणात माल विकणाऱ्या…

Read More

पैठणला ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन:गुणवत्तेला चालना; शिक्षक संघटनांकडून सत्कार‎

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर यशस्वीरीत्या सामायोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित शिक्षकांना सेवेत स्थैर्य मिळाले असून, शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही सामायोजन प्रक्रिया आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील बोंबले, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले,…

Read More

जमिनीच्या वादामधून कुऱ्हाडीने हल्ला; 5 जणांवर गुन्हा दाखल:पैठणची घटना; डोक्यावर वार केल्याने फिर्यादी जखमी‎

पैठण शहरातील शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाड, लोखंडी पाइप आणि लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अबरार गुलामनबी कुरेशी (४०, रा. ग्रीन चौक, पैठण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जमील इसाक कुरेशी, आरेफ इसाक कुरेशी, रिजवान आरेफ…

Read More

जायकवाडी:९३.५९%; आठ दरवाजांतून विसर्ग

मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा उच्च पातळीवर कायम असून धरण उपयुक्त पाणीसाठ्याच्या ९३.५९ टक्के भरले आहे. सध्या धरणात १०,००८ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, प्रशासनाने गोदावरी नदीपात्रातील विसर्गात काही प्रमाणात कपात केली आहे. सध्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी १,५२०.८३ फूट नोंदवली गेली आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ७१.७५ टीएमसी (२०३१.८५८ दशलक्ष घनमीटर) झाला असून एकूण…

Read More

कारवाईची भीती उरली नाही का?‎:दोन महिन्यांपूर्वी 255 किलो प्लास्टिक जप्त‎ केलेल्या बेकरीत 25 किलो कॅरीबॅग सापडल्या‎

दोन महिन्यांपूर्वी २५५ किलो प्रतिबंधित‎ प्लास्टिक जप्त करून २५ हजार ‎रुपयांचा दंड ठोठावलेल्या जुना मोढा ‎येथील नवकार बेकरीवर‎ महानगरपालिकेने शुक्रवारी (७‎ऑगस्ट) पुन्हा धडक कारवाई केली.‎या वेळी २५ किलो प्रतिबंधित ‎प्लास्टिकचा साठा जप्त करून पुन्हा‎२५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात‎आला. एकाच व्यापाऱ्याकडून वारंवार‎नियमभंग होत असल्याने दंडाची भीती‎उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित‎झाला आहे.‎ महानगरपालिकेच्या घनकचरा‎व्यवस्थापन विभागाच्या पथकाने…

Read More

गुंठेवारी सवलतीत बेटरमेंट चार्जेस माफ:पण मार्जिन, ॲन्सिलरीच्या नावाखाली 20% दंड; भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सोयी-सुविधांचे दावे; दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

निवासी बांधकामांच्या गुंठेवारीसाठी मनपा प्रशासनाने “बेटरमेंट चार्जेस’ शंभर टक्के माफ केल्याचे सांगितले खरे, परंतु “ॲन्सिलरी’ आणि “रोड मार्जिन’च्या नावाखाली तब्बल २० टक्क्यांपर्यंत दंड आकारला जात आहे. यामुळे गुंठेवारीचा खर्च लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी या मोहिमेकडे चक्क पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचे शुल्क आकारताना महसूल विभागाच्या रेडीरेकनर दराचा ैआधार घेतला जात…

Read More

लहान मुले-किशोरांचे मानसिक आरोग्य बिघडवले…:मेटावर 5400 कोटींचा दंड; न्यायालय म्हणाले- सोशल मीडियाचे व्यसन ‘उपद्रवा'सारखे

मेटावर न्यू मेक्सिकोच्या कोर्टाने ५४०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाने म्हटले की, मेटाने असे फीचर्स विकसित केले, जे मुले आणि किशोरांना दीर्घकाळ सोशल मीडियावर गुंतवून ठेवत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले. तसेच कंपनीने मुलांना ऑनलाइन शोषणासारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी पावले उचलली नाहीत. पहिल्यांदाच कोर्टाने सोशल मीडियाचे ‘व्यसन/मानसिक नुकसान’ हा ‘सार्वजनिक उपद्रव’ मानला. मार्चमध्येही मेटावर ३,५७० कोटी…

Read More