Headlines

अभिनेता प्रदीप रावत यांची शोकसभा:रघुवीर यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले, मुलगा विक्रमादित्य म्हणाला- तुम्ही आमचं दुःख आपलं मानलं, मनाला शांती मिळाली

‘गजनी’ आणि ‘लगान’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांची शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत शोकसभा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अभिनेते अखिलेंद्र मिश्रा, मुकेश ऋषी आणि कॉमेडियन सुनील पाल यांच्यासह चित्रपट उद्योगातील अनेक लोक उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शोकसभेची छायाचित्रे- 74 वर्षांच्या वयात मंगळवारी प्रदीप रावत यांचे निधन झाले…

Read More

सरकारने म्हटले– मेटाने डीपफेक आणि प्रचारात्मक सामग्री त्वरित हटवावी:कंपनीने मान्य केले की त्यांच्या प्रणालीमध्ये त्रुटी आहेत, कामाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज

सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाला आवश्यक बदल करण्यास आणि कंटेंट मॉडरेशन मजबूत करण्यास कठोर निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कंपनीकडून एक सविस्तर रोडमॅप देखील मागितला आहे. या रोडमॅपमध्ये कंपनीला हे स्पष्ट करावे लागेल की, ती आपल्या प्लॅटफॉर्म्सवरून प्रोपगंडा, डीपफेक आणि अवैध कंटेंट व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी कोणती पावले उचलणार आहे. हे…

Read More

11 लाखांचे दागिने लुटणारी आंतरराज्यीय टोळी 24 तासांत जेरबंद:पुण्यात गोळीबार करून दरोडा; मुख्य आरोपी उत्तर प्रदेशात वॉन्टेड

हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथे गोळीबार करून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास…

Read More

भोकरदनमध्ये महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला:एका मजुराचा मृत्यू, चार जखमी; बांधकाम सुरू असताना दुर्घटना

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा रोडवर असलेल्या राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. या भीषण दुर्घटनेत मलब्याखाली दबून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली…

Read More

हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करा:जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांचे आदेश

हिंगोलीच्या प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली यांनी सन 2025-26 मधील सोयाबीन खरेदी व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून संबंधित संस्थेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कठोर कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सहाय्यक निबंधकांना दिले आहेत. हिंगोली तालु्क्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करूनही त्यांचे पैसे अदा न केल्याच्या…

Read More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात:वाकड येथील काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू, कोण होते तुषार भूमकर?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात पुण्यातील वाकड येथील काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या त्यांच्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या एका भाजीपाल्याच्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अनर्थ ओढवला. ही धडक इतकी भयंकर…

Read More

Sunetra Pawar Inaugurates Vanrang 2026 Festival in Mumbai

काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना गावागावात अनेक पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. . मुंबईत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, हस्तकला, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा नव्याने परिचय करून देणाऱ्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग 2026’ या महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन…

Read More

हिंगोलीतील बेपत्ता तरुणाचा विदर्भातील सत्तरमाळ जंगलात खून:आठ जणांना अटक, यवतमाळ गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा विदर्भातील खंडाळा पोलिस ठाण्यांतर्गत सत्तमाळ जंगलात खून झाल्याचे उघड झाले असून 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर…

Read More

"हाथी चले बाजार, बाकी पुढचे बोलत नाही":एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; म्हणाले- अमित शहांना देशभक्ती शिकवायची गरज नाही

विद्यार्थ्यांना रस्त्यावर मारहाण झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत फिरकले नसून ते गायब असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांची पाठराखण केली असून, अमितभाई बोलतील तेव्हा हे पळून जातील, नक्षलवाद, कलम 370 काढून टाकलेल्या अमितभाईंना देशभक्ती दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता…

Read More

नागपूर विभागातील 70 हजार शेतकऱ्यांना 544 कोटींची कर्जमाफी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत थेट खात्यात रक्कम जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नागपूर विभागातील ७० हजार २९० पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ५४४ कोटी ७० लाख ५४ हजार १३० रुपये ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाईन प्रणालीद्वारे ही कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आली. या योजनेमुळे राज्यभरातील ६.२२ लाख पात्र खातेदारांच्या…

Read More