Headlines

फसवणूक करणाऱ्या टोळीवर 'मोका' अंतर्गत कारवाई:चारपट पैसे देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडले

नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना चारपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९’ (मोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. या टोळीचा प्रमुख परवेज अहमद पटेल याच्यासह एकूण सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने यवतमाळ येथील रहिवासी निखील आकाश चौहाण (वय ४०) यांना ५० हजार रुपयांच्या बदल्यात…

Read More

डॉक्टरांवरील हल्ले, खोट्या तक्रारींविरोधात पुणे येथे आंदोलन:डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

डॉक्टरांवरील वाढते हल्ले, रुग्णांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारी आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ ‘डॉक्टर प्रोटेक्शन फोर्स’ने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर सतत हल्ले होत आहेत. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिला…

Read More

EWS आरक्षणाच्या रिक्त जागा भरा- ॲड. सदावर्ते:महाराष्ट्रात पात्र विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र समितीची मागणी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या दहा टक्के आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी केली आहे. या प्रवर्गातील रिक्त जागा तातडीने भरून संपूर्ण निवड प्रक्रियेचे पारदर्शक पद्धतीने पुनर्विलोकन करावे, असे ते शुक्रवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकासारखी (एसआयटी) स्वतंत्र समिती नियुक्त करून पात्र विद्यार्थ्यांना…

Read More

पुणे-पिंपरीमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळित:रिक्षाचालकांवर तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सीएनजीचा पुरवठा विस्कळित झाल्याने रिक्षाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पंपांवर कमी दाबाने गॅस मिळत असल्याने चालकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून दैनंदिन उत्पन्नावरही परिणाम होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच गॅस पुरवठादार कंपन्या, पंपचालक आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक…

Read More

महापौर महिला आरोग्य अभियान सुरू:पहिल्याच शिबिरात 1,756 महिलांची आरोग्य तपासणी

पुणे महापालिकेतर्फे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे…

Read More

India Rejects US Criticism On FCRA Amendment Bill

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने FCRA (परदेशी निधी नियमन) सुधारणा विधेयकावर स्पष्ट केले की, हा भारताचा अंतर्गत मामला आहे. इतर कोणत्याही देशाला यावर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये, ज्यात अमेरिका देखील समाविष्ट आहे, तिथे परदेशी निधी आणि…

Read More

पुणे विद्यापीठात 'गुगल'च्या सहकार्याने 'एआय' प्रशिक्षण:प्रशासकीय अचूकता आणि शैक्षणिक सुधारणेसाठी 'एआय' महत्त्वाचे- प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘गुगल’च्या सहकार्याने प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. याप्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय काम अधिक अचूक आणि जलद करण्यासाठी ‘एआय’ अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. काळकर यांनी यावेळी घोषणा केली की, विद्यापीठ लवकरच ‘एआय’च्या वापराबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे…

Read More

मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा तीन वर्षांनंतरही अपूर्ण:सरकारची अवस्था म्हणजे 'लबाडाच्या घरचं आमंत्रण', अंबादास दानवेंची टीका

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याचा अनुषेश भरून काढण्यासाठी अनेक निर्णयांची घोषणा केली होती. या निर्णयांना आता जवळपास तीन वर्षे पूर्ण होत असताना त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा…

Read More

राहुल गांधींनी E20-पेट्रोलवर उपस्थित केले प्रश्न:म्हटले- हे कार-स्कूटर खराब करतेय, दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली

राहुल गांधींनी शुक्रवारी X वर एक व्हिडिओ पोस्ट करून E20-पेट्रोलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल यांनी सुमारे 53 सेकंदांचा व्हिडिओ जारी केला. व्हिडिओमध्ये राहुल कारची पेट्रोल टाकी उघडताना दिसले. झाकण उघडून आत डोकावले आणि म्हणाले की, सामान्यतः आपण म्हणतो की ‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली’. यावेळी देशात भ्रष्टाचाराची रांग लागली आहे. त्यापैकी एक…

Read More

कोट्यवधींचा गोसेखुर्द उजवा कालवा वर्षाभरातच भेगाळला:कंत्राटदार-अभियंत्यांना आमदार विजय वडेट्टीवारांनी धरले धारेवर

ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या वर्षभरातच कालव्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे भर हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ…

Read More