Headlines

24 कोटी जुन्या गाड्यांना पुन्हा मिळू शकते ई10 पेट्रोल:पण प्रीमियम श्रेणी, प्रीमियम ई10 पेट्रोलमुळे कारचे रबर, गॅस्केट खराब होण्याचा धोका कमी…

ई२० म्हणजेच २०% इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या विरोधादरम्यान सरकारने नव्या पर्यायावर विचारमंथन सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ पूर्वी बनलेल्या गाड्यांसाठी सरकार पुन्हा ई१० पेट्रोल आणू शकते. याला एक्सपी ९५, स्पीड, पॉवर ९५ सारख्या हाय-ऑक्टेन (प्रीमियम) पेट्रोलसोबत आणण्याचा विचार आहे. यावर सरकारी तेल कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या पर्यायामुळे पेट्रोल पंपांवर वेगळ्याने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे…

Read More

संभाजीनगरातील सामान्यांचे जीवनमानसुधारा, उद्योग आपोआप येतील:पंतप्रधानांचे मोदींचे आर्थिक सल्लागार संन्याल यांचा सत्ताधारी, प्रशासनाला सल्ला

शहरात नवीन उद्योग आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करायची असेल, तर केवळ पायाभूत सुविधा किंवा जमिनीची उपलब्धता पुरेशी नाही. शहरात राहणाऱ्या सामान्य लोकांचे जीवनमान गुणवत्ता (क्वालिटी ऑफ लाइफ) आणि नागरी सुशासन उंचावणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शहर राहण्या . चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) आणि सीएसएन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील ईझ ऑफ डूइंग…

Read More

जळगाव जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांत 6 मृत्यू:एकाची पत्नी, 2 मुलांसह आत्महत्या; दुसऱ्याने मुलासाठी प्राण गमावला

अमळनेर तालुक्यात गुरुवारी घडलेल्या दोन गावांतील वेगळ्या घटनांनी पित्याच्या नात्याचे दोन टोकाचे पैलू समोर आणले आहेत. एका घटनेत बापाने नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलांसह रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. तर दुसऱ्या घटनेत, पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात घातला, मात्र दुर्दैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त…

Read More

मालेगावात 5 दिवसांच्या मुलाची आईकडून 70 हजारांमध्ये विक्री:महिलेस अटक, पाच दिवसांची कोठडी

पोटच्या ५ दिवसांचा मुलाची ७० हजार रुपयांत विक्री करणाऱ्या निर्दयी मातेला आयशानगर पोलिसांनी अटक केली. फरजाना चांद शेख असे तिचे नाव आहे. तिला गुरुवारी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महिलेस खोट्या कागदपत्रांद्वारे गुन्ह्यात गोवल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. फरजाना हिचा विवाह फार काळ टिकला नाही. सध्या ती एकटी राहायची. तिला जुलैमध्ये मूल झाले….

Read More

नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा:MPSC पेपरफुटीतील संशयित सुनील गाडवे भाजपचाच कार्यकर्ता, सुनील मानेंचा खळबळजनक आरोप

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा असून राज्यसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणातील संशयित सुनील गाडवे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुनील माने म्हणाले,…

Read More

वादग्रस्त वक्तव्य भोवले:नितेश कराळे मास्तर यांना न्यायालयीन कोठडी, कारागृहात रवानगी

आपल्या बेधडक आणि विनोदी भाषणशैलीमुळे संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना वर्धा शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यानंतर दिनांक २७ ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी आता थेट कारागृहात करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि विहिंपची…

Read More

CM Fadnavis Issues Directives for Ganesh Utsav 2026 & Road Maintenance

राज्याचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची शुद्धता आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मंडळांनी भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळे . गणेशोत्सव-२०२६ मधील कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उत्सवाचे नियोजन करताना प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने…

Read More

नेपाळमध्ये महापूर:ठाणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेकरू संपर्काबाहेर, 31 जण अडकले असण्याची भीती, नातेवाईक चिंतेत

नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा आणि भोटेकोशी परिसरात ढगफुटीनंतर आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. ठाणे शहर, नौपाडा, समता नगर, बाळकुम, कल्याण पश्चिम, डोंबिवली तसेच नवी मुंबईतील वाशी परिसरातील काही नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. महापुरानंतर मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. २६ ऑगस्ट…

Read More

महागाई, बेरोजगारीविरोधात भाकपचा दिल्लीत मोर्चा:‘बदलाव जरुरी है’ घोषणेसाठी जिल्हाभर जनजागरण

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) महागाई, बेरोजगारी, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक झाला आहे. या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाकप १ सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चातून ‘बदलाव जरुरी है’ असा नारा दिला जाईल. देशात वाढती महागाई, शेतकरी-शेतमजुरांच्या समस्या, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, युवकांमधील बेरोजगारी, तसेच महिला व अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार…

Read More

अमरावती जिल्ह्यातील 550 ग्रामपंचायत प्रशासकांचा कार्यकाळ संपला:पुढील प्रशासकीय व्यवस्थेसाठी सीईओंचे शासनाकडे मार्गदर्शन

अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने, पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोण पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या साडेपाचशे ग्रामपंचायतींचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच…

Read More