Headlines

पाचोडच्या रुग्णालयात फायर सेफ्टीचा बोजवारा:दोन वर्षांपासून ऑडिटच नाही, पाण्याचे मुख्य कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत, प्रशासनाचे दुर्लक्ष‎

पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आग आटोक्यात ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्या असून, या टाक्यांना जोडलेले पाण्याचे मुख्य कनेक्शनही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या रुग्णालयाचे मागील दोन वर्षांपासून फायर ऑडिट झालेच नसल्याचे उघड झाले आहे….

Read More

केळगाव येथे रेशन कार्ड संदर्भात शिबिर उत्साहात:तालुका पुरवठा विभागाकडून लाभार्थींना मार्गदर्शन‎

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तथा चेअरमन विजय पवार यांच्या प्रयत्नातून केळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी सकाळी ११ वाजता रेशन कार्ड संदर्भातील विविध समस्यांवर मार्गदर्शन व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विशेष कॅम्प घेण्यात आला. संभाजी ब्रिगेडने केलेल्या निवेदनाची दखल घेत अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद शाळेतील…

Read More

जिममध्ये व्यायाम करतानाच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू:कन्नड शहरातील घटना, मृत अंकुश रावते बहिरगावचे रहिवासी‎

जिममध्ये दैनंदिन व्यायाम करत असताना बहिरगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी अंकुश कडुबा रावते (३०) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कन्नड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश रावते हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी आपल्या पुतणीला शाळेत सोडल्यानंतर कन्नड शहरातील एका खाजगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते….

Read More

जांबरगाव शिवारात बनावट डांबर निर्मिती:पत्र्याच्या शेडमध्ये थाटला कारखाना, अंधाराचा फायदा घेत संशयित पसार‎

समृद्धी महामार्गालगत पत्र्याच्या शेडआड सुरू असलेल्या बनावट डांबर तयार करण्याच्या कारखान्यावर वैजापूर पोलिसांनी धडक देत रॅकेटची पाळेमुळे उघड करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच अड्ड्याची पोलखोल होऊन कारवाई झाली होती; मात्र त्यानंतरही येथे पुन्हा संशयित व्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे. आता त्याच ठिकाणी पोलिसांना ८ ते ९ टन लोखंडी गजांचा साठा आणि विविध केमिकलने…

Read More

कन्नड येथील विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या:कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा उपक्रम‎

कन्नड रक्षाबंधनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवल्या. ‘सीमेवरचा जवान हा आमचा भाऊ’ या भावनेतून राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनींमधील देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी दिसून आली. कडाक्याची थंडी, ऊन आणि पावसाची पर्वा न करता देशाचे…

Read More

पैठण तालुक्यात 46 हजार नागरिकांची तहान टँकरवर‎:14 गावांना 25 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी; आडूळ तांडा येथे टंचाईची स्थिती बिकट‎

ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने तब्बल एक महिन्यापासून ओढ दिल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यासारखी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही तालुक्यातील १४ गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील तब्बल ४६ हजार ८४२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण् . विशेष म्हणजे, केवळ पैठणच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातूनही नवीन टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे…

Read More

वेरूळ येथे 300 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता:चार तास चालले महास्वच्छता अभियान, विविध शासकीय विभागांनी नोंदवला सहभाग‎

ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर आणि परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ मंदिर परिसर – सुंदर वेरूळ, आरोग्य संपन्न वेरूळ’ हा संदेश देत ३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चार तासांचे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत शिक्षण विभागाने वेरूळ लेणी परिसर, तर महसूल विभागाने घृष्णेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता केली. तसेच इतर शासकीय…

Read More

45 वर्षांनंतर कन्नड एसटी आगाराच्या मजबुतीकरणासाठी दोन कोटींचा निधी:नगर परिषद, महामंडळाच्या समन्वयातून पर्यटन विकास साधणार‎

कन्नड बस आगाराच्या आवारात सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून मजबूतीकरणासाठी पंचेचाळीस वर्षांनंतर दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, यामुळे आगाराचे वैभव वाढले आहे. आगामी काळात नगरपरिषद व एसटी महामंडळ एकत्र येऊन शहराचा व परिसराचा पर्यटन विकास साधणार . कन्नड बस आगाराच्या मजबूतीकरणासाठी शासनाच्या एमआयडीसीकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सध्या हे काम अंतिम टप्प्यात…

Read More

तुपकर यांना दिली नोटीस:शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुंबईत "वर्षा’ बंगल्याचा प्रतीकात्मक लिलाव, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, प्रलंबित पीक विमा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान या मागण्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संघटनेने गुरुवारी मुंबईतील विधानभवन परिसरात सरकारविरोधात थेट एल्गार पुकारला. आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचा प्रतीकात्मक लिलाव पुकारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अकल्पित आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे…

Read More

दिशा सालियन मृत्यू:मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, बापाने तरुण मुलगी गमावलीय, आम्हाला राजकारणाशी देणंघेणं नाही

१४ जून रोजी २०२० रोजी आत्महत्या करणारा प्रख्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची तत्कालिन व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांनी लैंगिक अत्याचार आणि हत्येचा संशय व्यक्त केलेला असताना पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवून तपास का केला नाही? केवळ सीआरपीसी १७४ (अपघाती मृत्यू ) अंतर्गत मर्यादित चौकशी करत…

Read More