ग्रामस्थांच्या “बेंच’ चळवळीतून शालेय विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदले:अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी शाळेत राबवला उपक्रम
अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पालकांनी एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत ‘एका विद्यार्थ्यासाठी एक बेंच, माझे अभिमानास्पद पालकत्व’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद . ‘बेंच’ चळवळीच्या आवाहनातून आठवडाभरातच ६८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. त्यातून विद्यार्थ्यांसाठी ४० बेंच उपलब्ध झाले व लोकसहभागातून शिंदेवाडी शाळेचे रूपडेच पालटले….