Headlines

'रेकॉर्डिंगवरून मी खूप शहाणा झालो, आता समाजानेही व्हावे':आंदोलन उशिरा करू, पण मराठा सेवकांची भक्कम फळी उभारणारच- मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यातील प्रत्येक विभागात कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करावी लागणार असून, या सेवकांना एक व्हॉट्सॲप नंबर दिला जाणार आहे. सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, आता कोण फुटला आहे आणि कुठे गेला आहे, हे काही कळत नाही. रेकॉर्डिंगमधून मी खूप शहाणा झालो आहे, मराठा समाजाने…

Read Full News

यूपीमध्ये अदा शर्मा म्हणाली- मला कोणतीही धमकी मिळालेली नाही:म्हटले- जेव्हा मिळेल तेव्हा उत्तर देईन, गोंडा माझे दुसरे घर आहे

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा पोहोचल्या. सलमान खानसोबत काम करणाऱ्या लोकांना मिळत असलेल्या धमक्यांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “मला आतापर्यंत कोणीही धमकी दिलेली नाही. जेव्हा मला कोणी धमकी देईल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन.” शुक्रवारी संध्याकाळी ६:३० वाजता अभिनेत्री एका खासगी दागिन्यांच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी पोहोचल्या होत्या. चाहत्यांचा उत्साह पाहून त्यांनी सांगितले, “गोंडा…

Read Full News

युसूफ पठाण यांना 15 कोटींचा प्लॉट मोफत मिळाला:गुजरात सरकारसोबत 14 वर्षांपासून वाद सुरू होता, 4 महिन्यांपूर्वी TMC चा ममता गट सोडला

गुजरात सरकारने खासदार युसूफ पठाण यांना वडोदरा येथे ९७८ चौरस मीटरचा भूखंड देण्यास मंजुरी दिली आहे. त्याची एकूण किंमत २०.५३ कोटी रुपये आहे. यातील ५०० चौरस मीटर जमीन मोफत दिली जाणार असून, तिची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. म्हणजेच युसूफ पठाण यांना उर्वरित ४७८ चौरस मीटर जमिनीसाठी ठरलेल्या किमतीच्या ५५ टक्के म्हणजेच सुमारे ५.५२…

Read Full News

कारमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक 2030 पासून अनिवार्य होईल:ड्रायव्हरला डुलकी लागल्यास गाडी अलार्म वाजवेल, सरकारने मसुदा जारी करून 30 दिवसांत सूचना मागवल्या

तुमच्या कारसमोर अचानक कोणी आले, तर कार आपोआप ब्रेक लावून थांबेल. 1 ऑक्टोबर 2030 पासून लॉन्च होणाऱ्या सर्व नवीन कारमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम’ (AEBS) उपलब्ध असेल. तसेच, 1 ऑक्टोबर 2032 पासून बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन-जुन्या कारमध्ये ही प्रणाली देणे अनिवार्य होईल. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी परिवहन मंत्रालयाने (MoRTH) या सुरक्षा…

Read Full News

500 कोटींचा व्यवहार या फक्त चावडीवरच्या गप्पा:आपापसातील कलगीतुरे थांबवून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे- छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांनी ५०० कोटींच्या कथित व्यवहारावर भाष्य करताना स्पष्ट केले की, ५०० कोटी या चावडीवरच्या गप्पा आहेत. त्या कुणी रेकॉर्ड करतात, कोण कोणाला कशाला ५०० कोटी देईल? द्यायचे असतील तर भाजप स्वतःहून नेऊन देईल, त्यांचे मंत्री संपर्कात आहेतच ना. कोणीही कोणाला ५०० कोटी दिले नाहीत आणि कोणी ते घेतलेही नाहीत, या फक्त पारावरच्या…

Read Full News

'500 कोटींचा विषय संपला, आता ऑडिओ क्लिपची चौकशी':टार्गेट करणाऱ्यांचे षड्यंत्र समोर आणणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती

कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी फेटाळल्यामुळे तो विषय संपला असला, तरी त्या क्लिपमधील वक्तव्यांची आता फॉरेन्सिक आणि सायबर चौकशी केली जाणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासणीचे आदेश दिले असून, यामागे कोणाला टार्गेट करण्याचे षड्यंत्र असल्यास ते या चौकशीतून…

Read Full News

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिकेला भेट दिली:पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर चर्चा झाली

पुणे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, मलनिस्सारण आणि पावसाळी पाण्याचा निचरा या महत्त्वपूर्ण नागरी सेवांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँक समूहाने सहकार्याच्या विविध शक्यतांचा आढावा घेतला. जागतिक बँक समूहाच्या वरिष्ठ शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. २३) पुणे महापालिकेला भेट देऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिका्नयिांशी चर्चा केली. या बैठकीत संभाव्य वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य,…

Read Full News

बिहारच्या फटाका कारखान्यात स्फोट, पती-पत्नीसह 7 जणांचा मृत्यू:इमारतीबाहेर मृतदेह विखुरले, दाट लोकवस्तीच्या परिसरात फटाके बनवले जात होते

बिहारमधील सिवान येथे फटाके बनवताना झालेल्या स्फोटात पती-पत्नी आणि त्यांच्या मुलीसह ७ जणांचा मृत्यू झाला. जामो पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलमापूर गावातील एका इमारतीत फटाके बनवले जात होते. त्याचदरम्यान अचानक स्फोट होऊ लागले. या स्फोटात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. लोकांचे मृतदेह रस्त्यावर विखुरले गेले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दीड तास अधूनमधून स्फोट होत राहिले. Source link

Read Full News

'रामदास कदम, हा फालतू धंदा बंद करा':प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार; म्हणाले- आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरणार नाही

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत कदम यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून व व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता…

Read Full News

पुण्यात राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचा दिमाखदार शुभारंभ:देशभरातील नामांकित संघांमध्ये रंगणार चुरशीच्या लढती; सेवलेकर म्हणाले, गोल्फ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा.

गोल्फ हा केवळ प्रतिष्ठेचा नव्हे, तर कौशल्य, एकाग्रता आणि अचूकतेचा खेळ आहे. हा खेळ देशातील सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांनी केले. पुण्यातील प्रसिद्ध ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट अँड क्लब येथे आयोजित राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशभरातील गोल्फपटूंना आपले कौशल्य…

Read Full News