Headlines

ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार:मृणालिनी चितळे म्हणाल्या, आजच्या पिढीने स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र मानले

आजच्या पिढीतील पुरुष पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत त्याचा आनंद घेत आहेत, हे चांगले चित्र आहे. पूर्वीच्या समाजसुधारकांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वास जाताना दिसत आहे. आज आपण वेगळ्या दृष्टीने स्त्री – पुरुष समानतेकडे बघत आहोत. समानतेचे हे सूत्र आजच्या पिढीने मानले असल्याची भावना ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन च्या वतीने…

Read Full News

नौदलाचे 'अग्निवीर' महाराष्ट्राच्या कोस्टल पोलिस दलात:कठोर प्रशिक्षण घेतलेल्या जवानांमुळे सागरी सुरक्षा भक्कम होणार- CM देवेंद्र फडणवीस

नौदलातील आपला कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक ‘अग्निवीरां’ना महाराष्ट्र पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलात (कोस्टल पोलिस) सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जवानांच्या कठोर प्रशिक्षण आणि अनुभवामुळे राज्याची सागरी सीमा अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार असून, त्यांना पोलिस दलात सामावून घेण्यासाठी नियमांत आवश्यक बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read Full News

महाराष्ट्रात दुष्काळ निवारण समिती स्थापन:दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह रोजगार, पाणी, शिक्षणावर उपाययोजनांची मागणी

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कष्टकरी, कारागीर समुह, मच्छिमार, एकल महिला, भटके-विमुक्त, आदिवासी आणि इतर वंचित घटकांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळाची सद्यस्थिती, त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे राज्यस्तरीय दुष्काळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र…

Read Full News

थरूर म्हणाले- भाजपला सल्ला, राहुल गांधींना गांभीर्याने घ्या:ते तरुणांमध्ये लोकप्रिय; एक दिवस आधी मोदींनी नाव न घेता अपयशी उत्पादन म्हटले होते

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी सांगितले की, माझा भाजपला सल्ला आहे की त्यांनी राहुल गांधींना गांभीर्याने घ्यावे. कारण गेल्या काही महिन्यांत राहुल यांनी युवा मतदारांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. थरूर यांनी एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये सांगितले की, मला वाटते की भाजपने राहुल गांधींकडे लक्ष दिले आहे, म्हणूनच ती अशा प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे….

Read Full News

'भाजपला दोष दिल्यास खपवून घेणार नाही':रामदास कदमांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार; भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत कदम यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून व व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड प्रत्युत्तर दिले…

Read Full News

लग्नास नकार दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीची चाकू भोसकून हत्या:चारित्र्याच्या संशयावरून नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर घडला भयंकर प्रकार

नवी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या एका जोडप्यात वाद झाल्याने संतापलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. या गंभीर घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी तत्परता दाखवत पळून गेलेल्या आरोपीला अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सादिया जाकीर शेख असे मृत तरुणीचे नाव असून ती…

Read Full News

'मोफत घर हवे, पण नागरी कर्तव्य विसरतात':झोपडपट्टीवासीयांना उच्च न्यायालयाने फटकारले; कठोर कारवाईचाही दिला इशारा

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले असून, झोपडपट्टीवासीयांना सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच त्यांचे पुनर्वसन हवे आहे, मात्र शहर स्वच्छ ठेवणे हे आपलेही समान नागरी कर्तव्य आहे, हे ते विसरतात, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच, झोपडपट्टीवासीय हे शहराच्या एकूण लोकसंख्येचा अविभाज्य भाग असले,…

Read Full News

पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांच्या विचारांवर राष्ट्रीय कार्यशाळा:राष्ट्रीय पुस्तक न्यास, समर्थ युवा फाऊंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा संयुक्त उपक्रम

महात्मा जोतीराव फुले यांचे समतावादी विचार, सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान आणि शिक्षणविषयक दृष्टिकोन आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारपासून (२४ ऑक्टोबर) तीन दिवसीय निवासी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महात्मा फुले आणि आजची तरुणाई’ हा या कार्यशाळेचा विषय असून, राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), समर्थ युवा फाऊंडेशन आणि विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या…

Read Full News

अमिताभ-दिलजीत यांना धमकी, मुंबईच्या महापौरांना ईमेल:लिहिले- अभिनेत्याचा बंगला उडवून देऊ, गायकावर आत्मघाती हल्ल्याची योजना

मुंबईच्या महापौरांना शुक्रवारी धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये महापौर कार्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील इंडिया टूर कार्यक्रमालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांना पाठवलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या…

Read Full News

आसारामची प्रकृती खालावली, आज पंचकर्मासाठी नेले नाही:छातीत दुखत असल्याची तक्रार, उज्जैनच्या अंकपात येथील आश्रमात घेत आहे उपचार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची शुक्रवारी प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्याची तक्रार असल्याने त्याला धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सालयात पंचकर्म उपचार घेण्यासाठी नेले नाही. त्याने अंकपात रोडवरील आश्रमात विश्रांती घेतली. प्रकृतीत सुधारणा झाल्यास शनिवारी पुन्हा रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे. आसाराम २१ ऑक्टोबर (बुधवार)पासून उज्जैनमध्ये आहे. तो बुधवार आणि गुरुवारी पंचकर्म उपचार घेण्यासाठी…

Read Full News