पोलंडचे पंतप्रधान 2027 मध्ये कोल्हापूरला भेट देणार:युवराज संभाजीराजे छत्रपतींशी बेंगळुरूत भेट; वळीवडे म्युझियम उद्घाटनासाठी सकारात्मक भूमिका
भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी संभाजीराजे यांनी कोल्हापूर – पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. इतिहासातील हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून शैक्षणिक व…