गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून माजी केंद्रीय मंत्री थेट दुचाकीवर:मराठवाडा पदवीधरच्या मतदानासाठी रावसाहेब दानवेंनी पत्नीसह मोटारसायकलवरून गाठले मतदान केंद्र
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026च्या मतदानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या अनोख्या एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणतीही व्हीआयपी गाडी किंवा समर्थकांचा ताफा न वापरता रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मलाताई दानवे यांच्यासह चक्क दुचाकीवरून मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन येथील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या स्थानिक जिल्हा…