Headlines

सुप्रिया सुळेंचा स्पाय पेन हा वेगळाच शोध:अदृश्य शक्तीचा तपास फक्त ताईच करू शकतात; महायुती 100 टक्के जिंकणार, संजय शिरसाट यांचा दावा

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पार पडत असलेले मतदान, मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप आणि विरोधकांनी केलेले आरोप, या सर्व मुद्द्यांवर शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. “ही ऑडिओ क्लिप शिवसेना आणि भाजपमध्ये जाणीवपूर्वक संशय निर्माण करण्यासाठी आणली गेली आहे, त्यामुळे याची प्रामाणिक आणि फॉरेन्सिक चौकशी…

Read Full News

पुंछमध्ये लष्कराने 7 संशयित IED जप्त केले:लाइट मशीनगनची मॅगझिनही सापडली; एक दिवस आधी 2 दहशतवादी समर्थकांना अटक

जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराने शोधमोहिमेदरम्यान 7 संशयित IED आणि 7.62 मिमी लाइट मशीन गन (LMG)ची मॅगझीन जप्त केली. संरक्षण सूत्रांनुसार, गुप्त माहिती मिळाल्यानंतर 156 टेरिटोरियल आर्मी आणि 37 राष्ट्रीय रायफल्सने कासबलारी गावाजवळ शोधमोहीम राबवली. यावेळी तपकिरी टेपने गुंडाळलेले 6 कंटेनर, निळ्या टेपने गुंडाळलेला 1 कंटेनर आणि एक संशयित मॅगझीन कंटेनर आढळला. याशिवाय एक काळी बॅग,…

Read Full News

शेनोडी शिवारातील 1.20 हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त:मूळ मालकिणीस जमीन परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील एका शेतकरी महिलेच्या जमीनीचे खरेदीखत अवैध सावकारीतून झाले असल्याचे निरीक्षण नोंदवत मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी घेण्यात आलेली 1.20हेक्टर जमीन मूळ मालकिणीला परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक तथा सावकाराचे जिल्हा निबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिले आहेत. शेनोडी येथील शेतकरी महिला शोभाबाई रणवीर पाईकराव यांनी मुलीच्या लग्नासाठी 2012 मध्ये गावातील इंदुबाई लक्ष्मणराव राऊत…

Read Full News

शरद पवारांची भेट केवळ सदिच्छा, त्यात राजकारण नाही:विधान परिषदेच्या मतदानावर काँग्रेसचे लक्ष – हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडी, शरद पवार यांच्यासोबत झालेली भेट आणि आज पार पडत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका यावर सविस्तर भाष्य केले. “महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात असून, शरद पवार यांची घेतलेली भेट ही पूर्णपणे सदिच्छा भेट होती,” असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिले आहे. ‘शरद…

Read Full News

मराठवाडा पदवीधर निवडणूक:18 वर्षांत सतीश चव्हाणांनी काय केले? 27 तारखेला निकालानंतर 'अंदर से कोण था' हे स्पष्ट होईल- प्रतापसिंह पाटील

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मतदानाच्या दिवशीच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या 18 वर्षांत पदवीधरांचा एकही प्रश्न सोडवला नाही. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित असून, 27 तारखेला निकाल जाहीर झाल्यावर ‘अंदर से कोण था’ हे संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्ट होईल,…

Read Full News

एका दगडात 3 पक्षी मारण्याचा डाव कोणाचा?:कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप, SIT चौकशी आणि स्पाय कॅमेऱ्याच्या आरोपांवर भाजपचा थेट पलटवार

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित ऑडिओ क्लिप, त्यातील 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे दावे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला ‘स्पाय कॅमेरा’ गैरव्यवहाराचा मुद्दा यावरून भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. “एका…

Read Full News

जिओच्या IPO चा आज शेवटचा दिवस:आतापर्यंत 6 पटांहून अधिक बोली मिळाल्या, 20% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो

देशातील सर्वात मोठ्या आयपीओ ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’चे सब्सक्रिप्शन घेण्याचा आज, 23 ऑक्टोबर रोजी, शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत हा आयपीओ 6 पटांहून अधिक भरला आहे. कंपनीच्या 19.75 कोटी शेअर्सच्या तुलनेत 119 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाल्या आहेत. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 13 पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 1.76 पट सब्सक्राइब झाला आहे. अँकर पोर्शनमधून आधीच उभारले…

Read Full News

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात स्पायकॅम पेनद्वारे पैसेवाटप:लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे प्रकार खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपिकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे आणि मतदान झाल्यानंतर तो व्हिडिओ दाखविल्यावर ठरलेली रक्कम दिली जात आहे, असा प्रकार…

Read Full News

अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?:फॉरेन्सिक चौकशीतून सत्य बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, स्पाय पेनवरून सुप्रिया सुळेंना टोला

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, पुण्यात भाजपकडून ‘स्पाय…

Read Full News

Murlidhar Mohol Claims Mahayuti Victory in Legislative Council Polls

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान पार पडत असून या सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार विजय मिळवतील, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळ . सुशिक्षित मतदार विकासाच्या पाठीशी; 5 पैकी 5 जागांवर विजयाचा दावा स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये…

Read Full News