Headlines

पदवीधर मतदानानंतर चंद्रकांत पाटलांचे भाकीत:म्हणाले- पुणे पदवीधर अन् शिक्षक निवडणुकीतही महायुतीचाच गुलाल; दोन्ही उमेदवार एकतर्फी जिंकणार!

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळच्या सत्रात कोल्हापुरातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेरील बूथना भेटी देत मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ निवडणुकीप्रमाणेच पुणे पदवीधर आणि शिक्षक…

Read Full News

आम्ही प्रतापसिंह पाटील यांच्यासोबतच:रोज शब्द बदलला तर किंमत राहत नाही, जरांगे पाटलांनी ऐकवलेली क्लिप एआय मार्फत तयार केलेली- अब्दुल सत्तार

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना पाठिंबा नसल्याची सुरुवात केली. मग यानंतर आम्ही राजकारणी आमच्या पद्धतीने कामाला लागलो असून, प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कन्नड, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फिरलो आहोत. त्यानंतर जर आपली भूमिका बदलली, तर पक्षाची प्रतिमा मलिन होते. पक्षाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला की त्यावर ठाम राहावे लागते….

Read Full News

79 कोटी लोकांना मोफत रेशन देणे अभिमानाची गोष्ट की लज्जास्पद?:रोहित पवारांचा केंद्राला सवाल, ‘विकसित भारत’च्या दाव्यांवरून निशाणा

एकीकडे देशाला ‘महासत्ता’ बनवण्याची आणि ‘विकसित भारत’ची स्वप्ने दाखवली जात असताना, दुसरीकडे जागतिक भूक निर्देशांकात भारताची १०० व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘भाषणांनी पोट भरत नाही आणि जाहिरातींनी कुपोषण मिटत नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार?’…

Read Full News

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना ट्रेनमधून कसे पकडले?:3 मिनिटांत पोलिसांनी आरोपींना ट्रेनमधून बाहेर काढले, SI प्रवासी बनून जवळ बसले होते

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करून पळून गेलेल्या शूटरांना कोटा पोलिसांनी ट्रेनमधून अवघ्या 3 मिनिटांत पकडले होते. जयपूर-पुणे ट्रेन कोटा स्थानकावर पोहोचण्यापूर्वी आरपीएफ आणि कोटा पोलिसांना तिन्ही आरोपी कोणत्या डब्यात बसले आहेत, याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार आरपीएफ आणि कोटा पोलिसांनी नियोजन केले. खरं तर, जयपूर-पुणे ट्रेन कोटा स्थानकावर पोहोचण्याची वेळ सकाळी 10:15 वाजता…

Read Full News

अजमेर दर्ग्यात पोहोचला बॉलिवूड स्टार रितेश देशमुख:पत्नी जेनेलिया-मुलांसोबत केली जियारत, चाहत्यांमध्ये सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख शुक्रवारी पत्नी जेनेलिया देशमुख आणि मुलांसह जगप्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात पोहोचले. येथे त्यांनी ख्वाजा साहेबांच्या मजारीवर जियारत करून दुआ मागितली. रितेश देशमुख दर्ग्यात पोहोचल्याची बातमी मिळताच चाहत्यांची गर्दी जमली. आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते. रितेश देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या सुरक्षेत दर्ग्यात जियारत केली. यावेळी…

Read Full News

ITBP DG Statement on China Arunachal Border Tension

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ITBPचे DG शत्रुजीत कपूर यांनी गुरुवारी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत अरुणाचल प्रदेशात चीन आणि भारताचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत अरुणाचलमध्ये अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थितीही निर्माण झाली. ही परिस्थिती अजूनही कायम आहे. जुलैच्या अखेरपासून ऊपरी सुबनसिरी जिल्ह्यातील असाफिला आणि माजा परिसरात तणाव कायम आहे. भारतानेही…

Read Full News

राष्ट्रवादीला अर्थखाते मिळावे ही आमची ठाम भूमिका!:सुनील तटकरे म्हणाले- रोहित पवारांचे बोलणे सोयीनुसार, जरांगेंना संपवण्याचे कोणी प्रयत्न करत नाही

“राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखाते मिळावे ही आमची पहिल्यापासूनची ठाम भूमिका राहिलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी यावर अद्याप चर्चा झाली नसली, तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही अपेक्षा रास्त आहे आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही पुन्हा चर्चा करू. रोहित पवार हे नेहमी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार विधाने करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि नाशिकचे सर्व…

Read Full News

जरांगे खोटं बोलतायत का? भाजपने सांगावं, 500 कोटी कुठे गेले?:संजय राऊतांचा सवाल, ED-CBI गप्प का? महायुतीवर पैशांच्या खेळाचा आरोप

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या क्लिपमधील संभाषणावरून शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर अत्यंत सडकून टीका केली. ‘श्रीकांत शिंदेंना आंदोलन संपवण्यासाठी ५०० कोटी…

Read Full News

दिवाळी सुट्टीतील सक्तीची शिक्षक प्रशिक्षणे रद्द करावे:प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण मंत्री, आयुक्तांकडे मागणी‎

दिवाळीच्या दीर्घ सुट्टीत आयोजित करण्यात आलेली शिक्षकांची सक्तीची प्रशिक्षणे तातडीने रद्द करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. शिक्षकांच्या अधिकृत सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक नियोजनात अडथळे निर्माण करू नयेत, अशी भूमिका समितीने घेतली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह शिक्षण आयुक्त यांना साकडे घातले…

Read Full News

सत्तेसाठी मराठा-ओबीसींमध्ये वाद:भाजप अन् शिंदे गट सत्तेसाठी भुकेले; 500 कोटींच्या क्लिप प्रकरणाची चौकशी करा- विजय वडेट्टीवार

या सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेना सत्तेसाठी भुकेले आहेत. ओबीसी असो की मराठा, या समाजापैकी कोणाचेही आरक्षण न काढता न्याय देण्यात यावा आणि कोणाचेही नुकसान होऊ नये, ही आमची भूमिका होती. पण सत्तेतील या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अजूनही स्पर्धा सुरूच आहे. एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांनी मराठा-ओबीसींमध्ये…

Read Full News