Headlines

यंदा मान्सूनमध्ये 12.6% कमी पाऊस:शेती, पाणी आणि विजेवर मोठा परिणाम; महाराष्ट्राचे 305, कर्नाटकचे 217 तालुके दुष्काळग्रस्त

यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा 12.6% कमी पाऊस झाला. दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. महाराष्ट्रातील 305 आणि कर्नाटकातील 217 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. आता रब्बी पिकांवरही संकट आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत रब्बीची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 26% मागे होती. कमी पावसामुळे जलाशयांमधील पाणीसाठाही घटला आहे. देशातील 178 प्रमुख जलाशयांची एकतृतीयांशपेक्षा जास्त…

Read Full News

शिक्षणाला वयाची मर्यादा नाही, सातत्याने ज्ञानार्जन करा, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एमएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत‎

शिक्षण कधीही थांबवू नका, कायम नवनवीन गोष्टी शिकत राहा. एमएड पूर्ण झाल्यानंतर नेट, सेट आणि पीएचडीपर्यंत मजल मारा. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञानार्जन करावे असे आवाहन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांनी केले. विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्र संचलित डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय व संशोधन…

Read Full News

मैदान गाजवलं; श्रीगोंद्याची कबड्डीत हॅट्ट्रिक!:14, 17, 19 वर्षे वयोगटांत जिल्हा विजेतेपद; तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेस पात्र‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Field Was Dominated; Shrigondya’s Hat trick In Kabaddi!, District Champion In 14, 17, 19 Years Age Groups; All Three Teams Qualified For The Zonal Tournament श्रीगोंदे4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रीगोंदे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत श्रीगोंदे तालुक्यातील महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या…

Read Full News

भारत युरोपचा दुसरा मोठा शस्त्र पुरवठादार:पूर्वी 28व्या क्रमांकावर होता; युक्रेन युद्धानंतर ₹8000 कोटींची रसद पुरवली, निर्यातीत 1600% वाढ

भारत जागतिक शस्त्र निर्यातक म्हणून उदयास आला आहे. ट्रेड डेटा मॉनिटरनुसार, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने युरोपीय देशांना ८,२७१ कोटी रुपयांचा दारूगोळा पुरवला. यात तोफगोळे आणि मोर्टारच्या गोळ्यांचा समावेश आहे. यासंबंधीच्या अहवालानुसार, पूर्व आणि मध्य युरोपमध्ये भारताची संरक्षण निर्यात १,६००% वाढली आहे. दक्षिण कोरियानंतर भारत आता या क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा दारूगोळा पुरवठादार आहे. चार…

Read Full News

देशाच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून सॉफ्टवेअर हटवले:नव्या रशियन हार्डवेअर तंत्रज्ञानाचा होणार वापर; 10 वर्षांत 2 मोठे सायबर हल्ले

सॉफ्टवेअर क्रॅश आणि सायबर हल्ल्यांच्या धोक्यांपासून अणुऊर्जा प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी भारतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात येत आहे. रशियात विकसित केलेले हे हार्डवेअर-आधारित तंत्रज्ञान सध्या तमिळनाडूमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात बसवले जात आहे. रशियन अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमने नुकतेच कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उपकरणांचे सुमारे 300 संच पाठवले आहेत. नवीन प्रणाली…

Read Full News

EC अधिकाऱ्यावर कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप:सुखबीर संधू, विवेक जोशींनी कॅबिनेट सचिवांकडे केली होती तक्रार, पण कारवाई नाही

दिल्लीमध्ये माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवालयाने निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. दोन्ही आयुक्तांनी 29 जुलै रोजी कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना स्वतंत्र पत्रे लिहून गर्ग यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, कॅबिनेट सचिवालयाचे मत होते की,…

Read Full News

सटाण्यात गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान:अभिलाषा कापडणीस प्रथम; सार्वजनिक स्वच्छतेसाठी डॉ. विद्या सोनवणे ब्रँड ॲम्बेसेडर‎

सटाणा नगरपरिषदेतर्फे आयोजित घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच शाळा-महाविद्यालयीन शाडूमाती गणेशमूर्ती स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांकाच्या अभिलाषा कापडणीस हिला ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या नेहा भांगडिया हिला ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या तन्वी शेवाळे हिला ५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी माजी नगरसेविका डॉ. विद्या…

Read Full News

बिबट्याच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत मिळवून देणार:खासदार डॉ. शोभा ‎बच्छाव यांची ग्वाही‎

बागलाण तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या वारसांना केंद्र शासनाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. भविष्यात अशा घटनांमध्ये जीवितहानी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजमेर सौंदाणे येथील अक्काबाई माळी व ठेंगोडा येथील बेबीबाई…

Read Full News

एमपीत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज:हिमाचलच्या 10 शहरांचे तापमान 10°C खाली, केदारनाथमध्ये तिसऱ्या दिवशी हिमवृष्टी

मध्य प्रदेशात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. गुरुवारी इंदूरजवळील हातोद येथे जोरदार, तर धारच्या पीथमपूरमध्ये हलका पाऊस झाला. दरम्यान, अनूपपूरच्या अमरकंटकमध्ये तापमान 15.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 2 दिवस इंदूर विभाग आणि नर्मदापूरममध्ये पाऊस पडेल. हिमाचल प्रदेशातील अधिक उंचीच्या भागांत सकाळ-संध्याकाळ तसेच रात्री थंडी जाणवत आहे. राज्यातील 10…

Read Full News

जायखेड्यात तरसाचा राखणदारावर हल्ल्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांत भीती:परिसरातील शेतकऱ्यांच्या धाडसाने टळला अनर्थ, तरस मक्यात पसार‎

. जायखेडा शिवारात बुधवारी (दि. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास एका शेतात राखणदारावर तरसाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आरडाओरडा करत शेकोटी पेटवल्याने हा हल्ला टळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विनोद ब्राह्मणकर यांच्या शेतात राखणदार म्हणून…

Read Full News