गोकुळच्या विजयाचा दाखला देत धैर्यशील मोहिते पाटलांचा महायुतीला इशारा:म्हणाले, ‘आता शिक्षक-पदवीधरच्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचाच गुलाल उधळणार!’
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. ‘आमचा रांगडा पाटील जिंकला, आता शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार,’ अशा शब्दांत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीला लक्ष्य केले. गोकुळच्या निकालातून कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा लढवय्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा…