Headlines

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड:रामराजे नाईक-निंबाळकरांची माघार, कराडमध्ये उदयसिंह पाटील विरुद्ध बाळासाहेब पाटील यांच्याकडे लक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि बँकेचे विद्यमान संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुका सोसायटी आणि कृषी प्रक्रिया या दोन्ही मतदारसंघांतील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निकषांनुसार सलग दहा वर्षांहून अधिक काळ संचालकपदावर राहिलेल्या नेत्यांच्या पात्रतेबाबत प्रश्न…

Read Full News

टायगर श्रॉफच्या समर्थनार्थ आले विद्युत जामवाल:म्हणाले- तुम्ही सर्वांत निर्भय आहात, मुंबई पोलिसांनी अशी घटना पुन्हा घडू नये याची खात्री करावी

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर अभिनेता विद्युत जामवालने त्यांचे मनोबल वाढवले आहे. विद्युतने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून टायगरला सर्वांत निर्भय व्यक्ती म्हटले. त्यांनी टायगरच्या चाहत्यांनाही प्रश्न विचारला की, जेव्हा ते आपल्या आवडत्या स्टारसाठी इतके प्रेम व्यक्त करतात, तेव्हा या कठीण काळात त्यांनीही काहीतरी केले पाहिजे. विद्युतने मुंबई पोलिसांकडे टायगरच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केले आणि अशी…

Read Full News

टायगरवर गोळीबार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट केवळ ₹35 हजारांत दिला:परदेशात पाठवण्याचे आमिष; हल्लेखोर विनातिकीट ट्रेनमध्ये चढले, कोट्यात पकडले गेले

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करणाऱ्या बदमाशांना 35 हजार रुपये मिळणार होते. हे पैसे काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. गोळीबारात सहभागी रेहान आणि अल्पवयीन आरोपी सुमारे 10 दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचले होते. दोघेही गँगस्टर अनिल पंडितच्या संपर्कात होते. कोटा शहराच्या एसपी तेजस्विनी गौतम यांनी सांगितले – प्राथमिक तपासात समोर आले आहे…

Read Full News

‘10 हजार मते बाद होत असतील, तर पदवी कोणी दिली':मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिक्षक-पदवीधर मतदारांवर मिश्किल टोलेबाजी

राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रचाराला वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, राज्यातील औद्योगिक विकास, परकीय गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवर भाष्य केले. यावेळी मतपत्रिकेवरील बाद होणाऱ्या मतांचा संदर्भ देत त्यांनी शिक्षक आणि पदवीधर…

Read Full News

पुणे ग्रँड टूरपूर्वी निकृष्ट कामांसाठी कंत्राटदारांसह अभियंत्यांवर कारवाई:रस्ते, पदपथ आणि 75 किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार; आयुक्तांचे निर्देश

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पदपथ, चौक आणि सायकल मार्गांच्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. रस्त्यांवरील युटिलिटी चरांचे निकृष्ट पुनर्भरण आणि मॅनहोलच्या चुकीच्या समपातळीकरणामुळे वारंवार रस्ते खराब होत असल्याने, अशा कामांमध्ये दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदारांसह देखरेख करणाऱ्या महापालिका अभियंत्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि….

Read Full News

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद:140 टँकरने पाणीपुरवठा, 2.74 लाख नागरिकांसह 96 हजार पशुधन तहानलेले

जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक गावांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याचे आव्हान निर्माण झाले असून, नागरिकांसोबतच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासनाच्या 18 ऑक्टोबर 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील 142 गावांमधील 752 वाड्यांना एकूण 140 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून 2 लाख 74…

Read Full News

मतदानाची सक्ती करा; मोदींकडे कायद्यासाठी आठवलेंचे साकडे:दिव्यांग, ज्येष्ठांसाठी घरपोच मतदानाची सूचना; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मतदान सक्तीचे करण्याची मागणी केली आहे. यासाठी कायदा करण्याची गरज असून, त्यांनी संसदेत निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यासंदर्भात निवेदन दिल्याचे आठवले यांनी नागपूरमध्ये सांगितले. आठवले यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची सुविधा देण्याची सूचना केली. त्यांना केंद्रापर्यंत जाण्याची अडचण येऊ नये, यासाठी ही व्यवस्था हवी. सीमेवरील सैनिक…

Read Full News

इलेक्ट्रिक, फ्लेक्स इंधनाच्या वाहनांना ग्राहकांची पसंती:नागपूरमध्ये 42.5 टक्के वाटा; दसऱ्याला नोंदणीत 10 टक्के वाढीचा अंदाज

नागपूरमध्ये इलेक्ट्रिक आणि फ्लेक्स इंधनावरील वाहनांना ग्राहकांची पसंती वाढत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ग्रामीण (पूर्व) आरटीओमध्ये नोंदणी झालेल्या ८,६६१ वाहनांपैकी ९९७ इलेक्ट्रिक आणि २,६८७ फ्लेक्स इंधन/ई-२० वाहने होती. यांचा एकत्रित वाटा ४२.५ टक्के होता. यंदा दसऱ्याला नागपूर शहरात २,४०० ते २,५०० वाहनांची नोंदणी अपेक्षित आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जास्त असेल. गेल्या…

Read Full News

70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज:सर्वोच्च न्यायालयातील बुद्धगया प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगणार

नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज (मंगळवार, २० ऑक्टोबर) सायंकाळी ५.३० वाजता ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या धम्मक्रांतीचा जागर या निमित्ताने होईल. यंदाच्या सोहळ्यात बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगितली जाईल. उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. शैलेश नारनवरे न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देतील. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत…

Read Full News

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण:तीनही आरोपी ताब्यात, 'अटेम्प्ट टू मर्डर' अंतर्गत गुन्हा दाखल; DCP राज तिलक रोशन यांची माहिती

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थान पोलिसांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता कोटा येथे तीन संशयितांना अटक केली. सर्व आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसने जयपूरला जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर बसने दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याची त्यांची योजना होती, परंतु पोलिसांनी त्यांना कोटा रेल्वे स्टेशनवर पकडले. या संदर्भात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे….

Read Full News