Headlines

नंदा बराटे यांना हिंदू महिला सभेतर्फे दुर्गा पुरस्कार प्रदान:गरजू मुलांच्या संगोपनासाठी सन्मान, 200 मुलांना पुस्तके, 25 मुलींचे कुमारिका पूजन

गरजू, निराधार आणि वंचित मुलांच्या संगोपनासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या नंदादीप फाउंडेशनच्या प्रमुख नंदा बराटे यांना हिंदू महिला सभेतर्फे देण्यात येणारा दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्टिस्ट्री संस्थेच्या संस्थापिका वीणा गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्टिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा वीणा गोखले आणि हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले उपस्थित होत्या. हिंदू…

Read Full News

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचे बिहार कनेक्शन:अभिनेत्यावरील गोळीबारात बेगुसरायचा ऋतिकही सहभागी; रायडरपासून बनला कॉन्ट्रॅक्ट शूटर

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांपैकी एक जण बिहारमधील बेगुसरायचा आहे. त्याची ओळख ऋतिक कुमार (22) अशी झाली आहे. त्याचे वडील रामू महतो बेगुसरायमधील पिपरई येथे राहतात. ऋतिक सध्या मुंबईतील अंधेरी परिसरात गिल बार्ली, उर्दू शाळेजवळ राहतो. तो बाईक रायडर आहे. कोटा पोलिसांच्या एसपी…

Read Full News

पुण्यात पेट्रोल दुचाकींचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणारे केंद्र सुरू:नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन, मुरलीकांत पेटकर उपस्थित

पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय पुणेकरांना उपलब्ध झाला आहे. ग्रीन टायगर मोबिलिटीने इव्हॉल्टिक्स ग्रीन मोबिलिटीच्या सहकार्याने धनकवडी येथे ईव्ही रेट्रोफिटिंग केंद्र सुरू केले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या केंद्रामध्ये निवडक…

Read Full News

हिंगोली जिल्ह्यात व्हॉटस्अप क्रमांकावर करता येणार टंचाईच्या तक्रारी:प्रशासनाकडून क्रमांक जाहिर, टंचाई कालावधीत योग्य नियोजन करण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा, हमी योजनेच्या कामांच्या तक्रारीसाठी प्रशासनाने व्हॉटस्‌अप क्रमांक ८५४५०८८५४५ जारी केला असून या क्रमांकावर गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची तातडीने सोडवणूक केली जाणार आहे. टंचाई कालावधीत नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सोमवारी (ता. १९) दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या…

Read Full News

कोकणच्या विकासासाठी निसर्ग-अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक:मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि आंबा-काजू उत्पादनावर चर्चासत्रात मंथन

कोकणचा निसर्ग, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करताना स्थानिकांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी दिशा निश्चित करणे आवश्यक आहे, असा सूर ‘कोकणचा शाश्वत विकास’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन (पुणे) आणि बॅ. नाथ पै सेवांगण (मालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रात १५० हून अधिक पर्यावरणप्रेमी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला. साथी…

Read Full News

दांडिया कार्यक्रमानंतर पुण्यात मारहाणीच्या दोन घटना:बाणेर आणि धनकवडीत तरुणांना मारहाण, दोन गुन्हे दाखल

दांडिया कार्यक्रमानंतर झालेल्या वादातून मारहाणीच्या घटना बाणेर आणि धनकवडी भागात घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी सहकारनगर आणि बाणेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. धनकवडीतील श्रीधरनगर भागात एका सोसायटीच्या आवारात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याबाबत अनिकेत मोरेश्वर तावरे (वय ३१, रा. श्रीनगर पार्वती हाईट्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात…

Read Full News

पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग 12 तास लावणीचा धमाका:महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, लयबद्ध पदन्यास, लावणीतील नजाकत आणि रसिकांच्या ‘वन्स मोअर’च्या गजरात ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजित सलग १२ तासांचा ‘लावणी महोत्सव’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उत्साहात संपन्न झाला. दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत रंगलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत लावणी कलावंतांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा…

Read Full News

भाजपच्या इंस्टा हँडलने छायाचित्रात फेरफार केल्याचा गुजराती व्यक्तीचा आरोप:ध्रुव राठीच्या ‘मतचोरी’विरोधातील लंडन आंदोलनानंतरच्या पोस्टमध्ये पाकिस्तानी ध्वज धरताना दाखवले

युनायटेड किंगडममधील लंडन येथे राहणाऱ्या एका गुजराती व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याचे एक छायाचित्र डिजिटल पद्धतीने बदलून त्याच्या हातात पाकिस्तानी ध्वज दाखवण्यात आला. भारतातील कथित ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतील अनियमिततांविरोधात यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांनंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. कामानिमित्त २०२० मध्ये अहमदाबादहून यूकेला गेलेल्या सद्दामहुसेन मकराणी यांनी दावा केला की,…

Read Full News

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलची आघाडी:हसन मुश्रीफ यांच्या महायुतीला धक्का, आघाडी सत्ता स्थापनेच्या दिशेने

कोल्हापुरातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाणारी म्हणजे गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक. या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीचे मतदान पार पडले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. याच मतमोजणीत आतापर्यंत…

Read Full News

श्री भवानी माताजी ट्रस्टतर्फे नवदुर्गा, आदर्श माता पुरस्कारांचे वितरण:माधुरी मिसाळ म्हणाल्या, महिलांचा नकारात्मक शक्तींविरुद्ध लढा आजही सुरूच

स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. स्त्रीला केवळ आदर्शाच्या चौकटीत अडकवू नका. तिने आधीच मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील अन्याय, विषमता आणि नकारात्मक शक्तींविरुद्ध समर्थपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले. श्री भवानी माताजी जैन…

Read Full News