Headlines

ठाणे मनपा निवडणुकीच्या वादातूनच पूर्णेकरांची हत्या:आरोपींनी कबुली दिल्याचा कुटुंबीयांचा दावा

उबाठा नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा जबाब आरोपींनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) चौकशीदरम्यान दिल्याचा दावा कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर २०२६ रोजी ठाण्यातील मानपाडा परिसरात त्यांच्या पक्ष…

Read Full News

तीन कर्जमाफी झाल्या तरी माझं नाव‎आलं नाही म्हणून आत्महत्या करतोय:नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथे व्हिडिओ काढून शेतकऱ्याची आत्महत्या‎

कर्जमाफीच्या तीन याद्यांमध्ये पात्र असूनही ‎‎नाव आले नाही, तसेच मुलीची शैक्षणिक‎‎फी माफ झाली नसल्याने ‎‎‎आर्थिक अडचणींचा‎‎सामना करावा लागत‎‎ आहे, असा व्हिडिओ‎‎काढून शेतकऱ्याने‎‎गळफास घेऊन‎‎आत्महत्या केली. नांदेड ‎‎‎तालुक्यातील बोरगाव‎तेलंग येथे सोमवा . नांदेड शहरापासून सुमारे १५ किलोमीटर‎अंतरावर असलेल्या बोरगाव तेलंग येथील‎शंकर क्षीरसागर यांच्याकडे पाच एकर‎जमीन आहे. नापिकीमुळे आर्थिक संकट‎निर्माण झाले असताना राज्य सरकारने‎जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही‎मिळाला नसल्याची…

Read Full News

संभाजीनगर-सोलापूर मार्गावरील जड वाहतूक 4 दिवस वळवली:कोजागरीनिमित्त तुळजापूर घाटही बंद

कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवार, २५ आॅक्टोबर रोजी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सुमारे सात ते आठ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत बदल केले आहेत. या काळात एकूण १४ मार्गांवर हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.तुळजापूर घाटही सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.भाविकांच्या…

Read Full News

मुंबई पोलिसांची कामगिरी:‘टायगर’वरील तिन्ही हल्लेखोर ‘एआय’मुळे 15 तासांतच कोटा रेल्वेस्थानकात जेरबंद, एआय फेस रिकग्निशनने शूटर्सची प्रत्येक हालचाल टिपली

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या रिहान ऊर्फ सुक्का, रितिक कुर्मी आणि एका अल्पवयीन अशा तिन्ही शूटरना एआय फेस रिकग्निशन तंत्रामुळे घटना घडल्यापासून १५ तास ३० मिनिटांत म्हणजे सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राजस्थानातील कोटा रेल्वे स् . त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ७…

Read Full News

भरदिवसा रस्त्यात बुलेट आडवी; विधी शाखेच्या विद्यार्थ्यावर हल्ला:कॉलेजच्या वादात मध्यस्थी केल्याचा राग; चौघांवर गुन्हा

कॉलेजमधील जुन्या वादात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून, एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भरदिवसा बुलेट आडवी लावून धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला. मात्र मदतीसाठी धावून आलेल्या मित्रावरही “सोन्या, इसको भी डाल दे” असे म्हणत चाकूने सपासप वार करून त्याला रक्तबंबाळ करण्यात आले. हा थरार शनिवारी (१७ ऑक्टोबर)…

Read Full News

China bans Indian tunneling equipment citing national security, new rules from 18 Nov; Fears of impact on India’s infrastructure projects

Marathi News National China Bans Indian Tunneling Equipment Citing National Security, New Rules From 18 Nov; Fears Of Impact On India’s Infrastructure Projects नवी दिल्ली/बीजिंग9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत बोगदे खोदणाऱ्या ‘टनल बोरिंग मशिन्स’सह (टीबीएम) अनेक अवजड यंत्रांच्या भारतातून निर्यातीवर नवे निर्बंध लादले आहेत. यामध्ये डोंगराळ भागात…

Read Full News

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफी, 8 लाखांची अट:विनानिकष शुल्कमाफीचा जीआर लवकरच निघणार

मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाअट माफ करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, शासनाच्या आदेशात (जीआर) ८ लाखांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट कायम असल्याने या घोषणा केवळ तोंडी आश्वासनेच ठरल्या आहेत. विनाअट शुल्कमाफीचा नवा सुधारित जीआर मंत्रालयातून अद्याप निघालेला नाही. मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर…

Read Full News

नवरात्रीचा खरा जागर: सक्षम, स्वावलंबी अन् निर्भय नारी:अष्टभुजा हेच भारतीय नारीचं खरं रूप; महिला आता सहभागाकडून थेट नेतृत्वाकडे! – विजया रहाटकर

भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जातं. आजची आधुनिक भारतीय नारी शिक्षण, करिअर आणि कुटुंब या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी समतोल साधत स्वतःला सिद्ध करत आहे. कौटुंबिक संस्कार, अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा आणि दृढ संकल्प यांच्या जोरावर सामान्य घरातील कार्यकर्त्या ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या विजया रहाटकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय उलगडला…

Read Full News

टायगर श्रॉफवर गोळीबार, गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ आला समोर:म्हणाला- बिश्नोई समाज नाराज, सलमान खानने माफी मागितली तर सर्वकाही ठीक होईल

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेदरम्यान गँगस्टर लॉरेन्सचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई समोर आला आहे. त्याने म्हटले आहे की, बिश्नोई समाजाची किंवा लॉरेन्सची सलमान खानसोबत कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. वाद केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे आहे. त्याने सलमानला पुन्हा एकदा गुरु जम्भेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. काळवीटाच्या शिकारीनंतर बिश्नोई समाज…

Read Full News

PM-CM यांच्या डीपफेक व्हिडिओद्वारे सायबर फसवणुकीचा धोका:गृह मंत्रालयाचा सल्ला, पाकिस्तानी +92 क्रमांकावरून येणाऱ्या कॉल-मेसेजपासून सावध राहा

केंद्र सरकारने सायबर फसवणुकीबाबत लोकांना सतर्क केले आहे. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, ठग पंतप्रधान, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची नावे तसेच डीपफेक व्हिडिओंचा वापर करून लोकांना लक्ष्य करत आहेत. अ‍ॅडव्हायजरीमध्ये पाकिस्तानच्या +92 कंट्री कोड असलेल्या क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्स आणि व्हॉट्सअॅप संदेशांबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, केवळ कंट्री कोडच्या आधारे कोणताही कॉल बनावट मानता येणार…

Read Full News