Headlines

अभिनेत्री राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट:16 वर्षांपूर्वी झाशीच्या तरुणाला नपुंसक म्हटले होते, नंतर झाला मृत्यू

झाशी न्यायालयाने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे. 16 वर्षांपूर्वी ‘राखी का इंसाफ’ या शोमध्ये राखी सावंतने झाशीतील 24 वर्षीय लक्ष्मण प्रसाद अहिरवार यांना नपुंसक म्हणत अपमानित केले होते. या धक्क्यामुळे लक्ष्मण यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आईच्या तक्रारीवरून राखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. समन्स बजावूनही राखी सावंत न्यायालयात…

Read Full News

शेतकऱ्यांचा डेटा एका क्लिकवर; नुकसानभरपाई, विम्याची प्रक्रिया होणार सोपी:शेअर क्रॉपर्सने विकसित केले तीन डिजिटल प्लॅटफॉर्म, 19 ला लोकार्पण; एफपीओना 5 ट्रॅक्टर मिळणार

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पात्रतेच्या याद्यांमधील नोंदी यांसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि माहितीवर आधारित करण्यासाठी पुण्यातील शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एससीपीएल) डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची जमीन, पिके, पेरणी, उत्पादन, खर्च आणि नुकसानीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे….

Read Full News

नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध अभ्यासिकेची तोडफोड केल्याचा गुन्हा:साहित्याचे नुकसान, जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल

पर्वती पायथा परिसरातील अभ्यासिका आणि ग्रंथालयाची तोडफोड करून साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक सूरज लोखंडे, प्रिया गदादे-पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुकुंद अनिल ऊर्फ अनिरुद्ध गायकवाड (वय ४५, रा. राजीव…

Read Full News

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकला:पुढील भागाचे नुकसान, टेकऑफच्या वेळी अपघात

दिल्लीहून दुबईला जाणारे एमिरेट्सचे विमान EK 517 टेकऑफदरम्यान एका पक्ष्याला धडकले. त्यामुळे विमानाचा पुढील भाग चेपला गेला. या विमानाने संध्याकाळी ४:२५ वाजता उड्डाण करायचे होते. घटनेनंतर विमानतळावरील ग्राउंड स्टाफने विमानाची संपूर्ण तपासणी केली. व्हिडिओमध्ये विमानतळावरील कर्मचारी विमानाच्या नोज कोनची (पुढील भागाची) तपासणी करताना दिसत आहेत. उड्डाणादरम्यान किंवा टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्षी विमानाला धडकतात, तेव्हा…

Read Full News

प्रकाश राज म्हणाले- सरकार बदलू, पण लोकशाही पद्धतीने:म्हणाले- आम्ही बांगलादेश किंवा नेपाळ नाही, तिरंगा मार्चपूर्वी ताब्यात घेण्यावरही उपस्थित केले प्रश्न

अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकारमध्ये बदल करण्याच्या मागणीला पाठिंबा देत म्हटले की, भारतात सत्ताबदल निवडणुका आणि घटनात्मक मार्गानेच झाला पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशाकडे संविधान, मतदानाचा अधिकार आणि शांततापूर्ण आंदोलनाची ताकद आहे. २०२९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचेही त्यांनी म्हटले. तिरंगा मार्चपूर्वी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांचा आवाज दाबल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित…

Read Full News

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात! चंद्रकांत पाटलांची मिश्कील टिप्पणी:दोन चॉकलेट देत म्हणाले, ‘बोलणे कमी आणि काम जास्त करा’

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेल्या पडळकरांची आता पुन्हा निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी…

Read Full News

आयडीबीआय बँकेतील 61 टक्के हिस्सा विक्रीला आक्षेप:विश्वास उत्तगी म्हणाले, 'राष्ट्रीय संपत्ती खासगी हातात देण्याचा डाव', संसदेत चर्चेची मागणी

आयडीबीआय बँकेतील ६१ टक्के हिस्सा विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग कर्मचारी राष्ट्रीय संघटनांचे नेते विश्वास उत्तगी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ही देशाच्या जनतेची संपत्ती असून, तिच्या खासगीकरणाचा निर्णय संसदेतील चर्चेनंतरच घेतला पाहिजे. प्रशासकीय पातळीवर परस्पर निर्णय घेऊन राष्ट्रीय संपत्ती खासगी किंवा विदेशी कंपन्यांच्या ताब्यात देणे चुकीचे आहे, अशी भूमिका…

Read Full News

अजित पवार हयात असते, तर असं करण्याचं धाडस झालं नसतं:विधान भवनातील प्रवेश प्रक्रियेवरून अण्णा बनसोडेंची नाराजी, राहुल नार्वेकरांवर पक्षपाताचा आरोप

विधान भवनात नागरिकांना प्रवेश देण्याच्या प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस पडताळणी आणि चौकशीच्या प्रक्रियेमुळे तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा…

Read Full News

Beed Teacher Arrested for Allegedly Molesting 4 Class 4 Girls in Gevrai

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या 4 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आल . विद्यार्थिनींनी घरी सांगितला प्रकार लुखामसला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात….

Read Full News

लोहगड केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी घडामोड:उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, कुटुंबीयांनी मानले CM फडणवीसांचे आभार

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे केतन अग्रवाल याच्या मृत्यूने समोर आलेल्या कथित हत्याप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनच्या कुटुंबीयांनी या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि खटल्यात आरोपींविरुद्धची…

Read Full News