अमरावतीत हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक:तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर भीषण अपघात झाला. पायी जात असलेल्या 5 मजुरांना मागून आलेल्या हायड्रा क्रेनने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत 3 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य 2 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागून…