कळसूबाई मंदिराला ‘वारली’चा साज:5 दिवस मेहनतीने परिसर सजला; आदिवासी संस्कृतीचे दर्शन
कळसुबाई शिखरावर रंगकामासाठी आवश्यक साहित्य पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. जहागीरदारवाडीचे सरपंच आणि स्थानिक तरुणांच्या सहकार्याने साबळे कुटुंब शिखरावर जाते. तेथे मुक्कामाची व्यवस्था स्थानिक हॉटेलचालकांकडून तंबू उभारून केली जाते. रमेश साबळे, पत्नी पूजा साबळे हे सलग पाच वर्षांपासून कळसूबाई मंदिरावर वारली चित्रकला साकारत आहेत. नवरात्रोत्सवाच्या चार ते पाच दिवस आधी रंगकामाला सुरुवात होते. शिखरावर एक…