Headlines

मोबाइलच्या युगात पुस्तकांशी मैत्री करा- नाईकवाडी:सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाईकवाडी यांचे आवाहन, वाचन प्रेरणा दिन उत्साहात‎

भारतासारख्या प्रगत असलेल्या देशात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाइल प्रत्येकाच्या हाती आहे. मात्र त्यातून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता आपण पुस्तक वाचनातून खऱ्या अर्थाने ज्ञानी व्हावे. जीवनात यश मिळवायचे असेल तर पुस्तक “वेडे “व्हा. तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी माणूस म्हणून घडवतील” असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते व माणुसकीची शाळाचे प्रणेते शिवाजी नाईकवाडी यांनी व्यक्त केला. माजी राष्ट्रपती…

Read Full News

सातव्या माळेला मोहटा देवी गडावर राज्यभरातील भाविकांची मांदियाळी:देवी मातेच्या जयघोषाने मोहटादेवी गड दुमदुमला‎

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेनिमित्त शनिवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि दुष्काळी परिस्थितीची पर्वा न करता भाविकांनी मोहटादेवी मातेच्या दर्शनासाठी गडावर हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता. देवीच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला होता. सहाव्या माळेपासूनच मोहटादेवी गडाकडे भाविकांचा…

Read Full News

गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू:2 दिवसांनंतर उसाच्या शेतात आढळला मृतदेह; आ.लंघेंची घटनास्थळी भेट‎

नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात भोऱ्याबाबा दादासाहेब अहिरे (वय ५०, मूळ रा. तिळापूर, ता. राहुरी) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. १५ ऑक्टोबरच्या रात्री काशिनाथ जनार्दन आवटी यांच्या वस्तीबाहेर झोपलेले असताना अहिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दोन दिवसांनंतर शोध घेतला असता, उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. अहिरे हे अनेक…

Read Full News

संसार टिकवायचा नाही, फुलवायचा‎:पूज्य प्रवीणऋषीजी यांचे तीन आठवड्यांच्या शिबिरातून दाम्पत्यांना नातेसंबंधांचे धडे‎

संसारात सुख हवे असेल, तर आधी जोडीदाराला सुख देण्याची तयारी हवी. चुका मोजण्यापेक्षा गुण ओळखा, तक्रारींपेक्षा कौतुक करा आणि एकमेकांविरुद्ध लढण्याऐवजी समस्येविरुद्ध एकत्र उभे राहा, असा वैवाहिक जीवनाचा व्यावहारिक मंत्र उपाध्याय प्रवर पूज्य प्रवीणऋषीजी यांनी तीन आठवड्यांच्या ‘ब्लिसफुल कपल शिबिरा’तून दिला. शिबिरार्थी प्रीती सी. मुथियान यांनी नोंदवलेल्या मुद्द्यांतून सुखी संसाराची गुरुकिल्ली उलगडली आहे. जोडीदाराला बदलण्याचा…

Read Full News

कोलकाता दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी म्हणाला- आईला मरताना पाहिले:दावा- आयोजकांनी मंडप कोसळण्याची शक्यता व्यक्त केल्याने झाली चेंगराचेंगरी

बाहेर पाऊस पडत होता. कोणालाही बाहेर जायचे नव्हते. पावसापासून वाचण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे असलेले लोक आत येण्यासाठी धक्काबुक्की करू लागले. गर्दी इतकी वाढली की, श्वास घेणे कठीण झाले. दबाव सहन न झाल्याने आत उभे असलेले सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडले. मीही लोकांच्या खाली दबून गेलो होतो. वाचणे कठीण होते. कसाबसा स्वतःला सावरत आईजवळ पोहोचलो, पण तिचा मृत्यू…

Read Full News

CJPची मागणी- सौरव, आशुतोषची सुटका करा:विशेष न्यायालय आज घेणार निर्णय; 5 दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर करण्यात आली होती अटक

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेची मागणी केली आहे. दोघेही तिहार तुरुंगात पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. CJPच्या लीगल टीमने विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर जामीनदारांची कागदपत्रे जमा केली आहेत. दोघांच्या सुटकेबाबत रविवार दुपारपर्यंत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. वास्तविक, पोलिसांनी दोघांना CJPच्या इतर कार्यकर्त्यांसह जंतर-मंतरवर आंदोलनात १३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले…

Read Full News

शब्बीर अहलुवालियाच्या रोमँटिक सीनवर कांचीने घेतली फिरकी:म्हणाल्या- किती लग्ने आणि हनिमून झाले, आता जळफळाट होत नाही

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये शब्बीर अहलुवालिया आपल्या रोमँटिक, माचो आणि रॉकस्टार प्रतिमेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची पत्नी कांची कौल सौंदर्य आणि बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. दोघे जवळपास १८ वर्षांपासून एकत्र आहेत आणि आता कलर्सच्या ‘धमाल विद पती, पत्नी और पंगा सीजन २’ या शोमध्ये स्पर्धक आहेत. शोमध्ये प्रेक्षकांना त्यांची नोकझोक, मस्ती आणि एकत्र घालवलेल्या क्षणांची झलक पाहायला…

Read Full News

दिंडोरीत दुष्काळ जाहीर करा:महाविकास आघाडीचे उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांची‎मध्यस्थी, उपोषण स्थगित‎

तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण छेडण्यात आले. मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन तूर्त स्थगित केले. मात्र, आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय…

Read Full News

सटाणा कॉलेजात व्यसनमुक्तीचा जागर:100 विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ‎

येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांनी तंबाखू, दारू व अमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत ‘निरोगी महाराष्ट्रा’चा संकल्प केला. ‘जागर आरोग्याचा, मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या…

Read Full News

केदारनाथमध्ये हिमवृष्टी, तापमान शून्याखाली:उत्तर प्रदेशात शेतांमध्ये पूर, कमरेपर्यंत पाणी; 7 राज्यांमध्ये पावसाची शक्यता

उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीमुळे तापमान उणे अंशापर्यंत पोहोचले आहे. केदारनाथमध्ये तापमान -6°C, बद्रीनाथमध्ये -5°C आणि गंगोत्रीमध्ये -5°Cच्या आसपास राहिले. तर यमुनोत्रीमध्ये तापमान केवळ 1°C नोंदवले गेले. उत्तर प्रदेशात पूरस्थिती अद्याप समस्या कायम आहे. लखनऊ आणि सीतापूर येथील पूराचे पाणी कमी होऊ लागले आहे, मात्र पाणी साचल्यामुळे परिस्थिती बिघडलेली आहे. सीतापूरमध्ये शेकडो एकर भाताचे पीक पाण्याखाली…

Read Full News