Headlines

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत फेकून मारली, पण निवडणुकांवर लाखांची उधळण:कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी1 लाख कोटी मिळतील- संजय राऊत

राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, मात्र जे राज्य चालवत आहेत, त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे. सर्वात जास्त पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आणि कसा आला, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केल्यास राज्याचे कर्ज आपोआप कमी होईल. एवढेच नव्हे, तर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात,…

Read Full News

कोलकाता चेंगराचेंगरीत 19 ठार, आयोजकांसह 7 जण अटकेत:मृतांत बारावीची विद्यार्थिनी, नर्सचा समावेश; मंडपाला मिळाला होता बेस्ट-ऑफ-बेस्ट अवॉर्ड

कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात शनिवारी संध्याकाळी चेंगराचेंगरी होऊन 19 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांसह 7 जणांना अटक केली आहे. गिरिश पार्क पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांत 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारावीची विद्यार्थिनी आणि…

Read Full News

नवरात्रोत्सवात डाळिंबासह सीताफळ दोनशे पार‎:उपवास, पूजा अन् प्रसादासाठी मागणी, केळी 50 रुपये डझन, सफरचंद 180 रुपये किलोवर‎

. नवरात्रोत्सव सुरू झाल्याने फळांची मागणी वाढली आहे. या काळात अनेक भाविक उपवास करतात. उपवासासाठी फळांना अधिक पसंती दिली जाते. देवीच्या पूजेसाठी, नैवेद्यासाठी, तसेच प्रसाद म्हणूनही फळांचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात फळांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मागणी वाढल्याने फळांच्या किमतीत थेट २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाळिंब, सीताफळ…

Read Full News

कवठा येथे अज्ञाताने एकरातील कपाशी टाकली उपटून:फुलोऱ्यात आलेले उभे पीक केले उद्ध्वस्त; संतापाची लाट, आरोपीवर कारवाईची मागणी‎

शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून, डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन व निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत उभे केलेले पीक क्षणात नष्ट झाले, तर त्या बळीराजाच्या मनावर काय आघात होतो? वर्षभराच्या कष्टाचे फळ डोळ्यांदेखत मातीत मिसळल्याने जगायचे तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न अकोट तालुक्यातील कवठा बु. येथील एका घटनेने उपस्थित केला आहे. गावातील शेतकरी रामेश्वर मरकाळे यांच्या शेतातील…

Read Full News

चांगली पुस्तकं वाचल्यास ज्ञानदेव प्रसन्न- विठ्ठल कुलट:बोर्डी येथील पीएमश्री शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात‎

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची परिस्थिती गरिबीची होती. कामधंदा करून गावातील शाळेत ते शिकले. ते जागेपणी मोठी स्वप्ने पाहत. ती जिद्दीने साकार करत. ज्ञान हाच देव आहे, असे ते मानत. नित्य चांगले वाचन केले की तो प्रसन्न होतो. चांगले काम केले की तो प्रसन्न होतो. यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे आपणही ज्ञानाच्या देवाला प्रसन्न…

Read Full News

गुंजमाथा देवीला ऐतिहासिक वारसा‎:साखरखेर्डा परिसरातील भाविक दर्शनासाठी‎

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या ऐतिहासिक गावाला समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या या गावातील अनेक वास्तू आजही गतवैभवाची साक्ष देतात. ऐतिहासिक परंपरेसोबतच धार्मिक श्रद्धा, लोकसंस्कृती आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा जपणारे साखरखेर्डा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. याच धार्मिक परंपरेत नवसाला पावणारी गुंजमाथा आदिशक्ती श्री जगदंबा माता हिचे…

Read Full News

भक्ती, संस्कृती, उत्साहाचा संगम; भूमी फाउंडेशनचा पुढाकार:उत्कृष्ट वेशभूषा व सादरीकरणाला दाद; गरबा महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद‎

शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भूमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य गरबा महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महोत्सवाच्या नवव्या वर्षात भक्ती, संस्कृती, उत्साह आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विनामूल्य प्रवेश, लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीमुळे हा महोत्सव विशेष आकर्षण ठरला. महोत्सवात गरबा स्पर्धेतील विजेत्यांना दास मोबाइलच्या वतीने विविध आकर्षक…

Read Full News

5.18 लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका:सुमारे 734 कोटींची गरज, 5.18 लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा‎फटका; सुमारे 734कोटींची गरज‎

यंदा जिल्ह्यात पावसाने दगाफटका केल्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख ११ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा नुकसानीचा विस्तृत अहवाल लवकरच राज्य शासनाकडे सादर केला…

Read Full News

आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा:वडिलांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांत तक्रार दाखल‎

तालुक्यातील अनकवाडी येथील अर्पित मंगेश मुंद्रे (वय १८) हा आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात गेलेला अर्पित घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अर्पित हा गुरुकुंज मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वेल्डर ट्रेडच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अनकवाडी येथून तो दररोज आयटीआयमध्ये ये-जा…

Read Full News

महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळाचे उद्घाटन‎:अभ्यास मंडळ म्हणजेच विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ- प्रा. डॉ. कोलते

विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीची संधी देणारे, त्यांच्या विचारांना नवी दिशा प्रदान करणारे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे अभ्यास मंडळ हे विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. कोलते यांनी केले. स्थानिक नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे संचालित महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती येथे इंग्रजी, मराठी…

Read Full News