Headlines

HDFC बँकेचा नफा 4.7% वाढून ₹19,510 कोटींवर:दुसऱ्या तिमाहीत नेट इंटरेस्ट इन्कम 9.7% वाढली; ॲसेट क्वालिटी सुधारली, ॲडव्हान्स-डिपॉझिटमध्ये दुहेरी अंकी वाढ

देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC ने या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीचे निकाल आज 17 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहेत. बँकेचा स्टँडअलोन निव्वळ नफा वार्षिक आधारावर 4.7% वाढून ₹19,510 कोटींवर पोहोचला आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक आधारावर 9.7% वाढून ₹34,619 कोटी झाले आहे. त्याचबरोबर बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. बँकेचे निकाल…

Read Full News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:आरोपी जन्मदात्या वडिलांना नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म कारावास, हिंगोली न्यायालयाचा निर्णय

हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम जन्मदात्या वडिलांना हिंगोली जिल्हा न्यायालयाने नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म सश्रम कारावास आणि १ लाख २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिंगोलीच्या जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांनी शनिवारी ता १७ हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, न्यायालयाने पिडीत मुलीला मनोधैर्य योजने अंतर्गत ५ लाखांची आर्थिक मदत देण्याचेही निर्देश…

Read Full News

'SIR' ला विरोध हे केवळ निमित्त, खरा विरोध लोकशाहीला:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा डाव

देशात विरोधकांनी तसेच कॉकरोच जनता पार्टीमधील तरुणांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच एसआयआर रद्द करण्यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाला ‘अराजकता’ म्हणत सरकारने विरोधकांवर पलटवार केला आहे. आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे….

Read Full News

केरळमच्या माजी मुख्यमंत्र्यांना EDचे समन्स:घरी नोटीस चिकटवली, मनी लाँडरिंग-भ्रष्टाचार प्रकरणात दोन FIR आधीच दाखल

केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना शनिवारी ईडीने समन्स बजावले. तिरुवनंतपुरम येथील भाड्याच्या घरावर समन्सची नोटीस चिकटवण्यात आली. एजन्सीने त्यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हजर राहून जबाब नोंदवण्यास आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. विजयन यांच्यावर दोन कंपन्या—सीएमआरएल आणि एक्सालॉजिक—यांच्यात झालेल्या पैशांच्या व्यवहारात अनियमितता केल्याचा आरोप आहे. यापैकी एक्सालॉजिक ही कंपनी त्यांच्या…

Read Full News

मदनापुरात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू:शिकारीची चर्चा, वन विभागाने केला खुलासा

किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रांतर्गत मदनापुर येथे शनिवारी सकाळी रेल्वेच्या धडकेत एका मादी वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. किनवट ते नांदेड रेल्वेमार्गावर सोमेश्वर महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली. सुरुवातीला वाघिणीची शिकार झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि मृत वाघिणीच्या…

Read Full News

सिडकोत भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्यवसाय:पोलिसांचा छापा, अल्पवयीन मुलीसह 2 पीडितांची सुटका

शहरातील सिडको परिसरातील क्रांती चौक येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायावर नांदेड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या प्रकरणातील पती-पत्नीवर आहे. शोभा शंकर रासे (वय 45) आणि शंकर चुडामन रासे (वय 51, दोघेही रा. क्रांती…

Read Full News

"तुझा नेक्स्ट गेम…", प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी!:ठाण्यात तणावात भर; प्रताप सरनाईकांनी घेतली कुटुंबीयांची भेट

शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर हिच्या मोबाईलवर “तुझा नेक्स्ट गेम” असा जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या धमकीमुळे आधीच दुःखात असलेले पूर्णेकर कुटुंबीय आता तीव्र…

Read Full News

बंगला पाडल्याच्या वृत्तांदरम्यान दुर्गा मंडपात पोहोचली काजोल:आई तनुजा, बहीण तनिषा आणि मुलेही सोबत; जया-श्वेता बच्चनही दिसल्या

अजय देवगण आणि काजोल यांच्या जुहू येथील बंगल्याच्या एका भागावर बीएमसीच्या कारवाईच्या बातम्यांदरम्यान काजोल कुटुंबीयांसह मुंबईतील नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात पोहोचल्या. त्यांच्यासोबत आई तनुजा, बहीण तनिषा मुखर्जी, चुलत भाऊ अयान मुखर्जी, मुलगा युग देवगण आणि मुलगी न्यासा देवगणही दिसले. जया बच्चन, श्वेता बच्चन आणि सुमोना चक्रवर्ती यांनीही मंडपात पोहोचून देवी दुर्गेचे दर्शन घेतले. कुटुंबीयांसह…

Read Full News

किल्ले प्रतापगडावर 367 मशालींचा ऐतिहासिक दीपोत्सव:शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग, भवानी माता मंदिराच्या 367 व्या वर्षपूर्तीनिमित्त गडावर भव्य सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्री भक्ती, परंपरा आणि शिवप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. प्रतापगडावरील श्री भवानी माता मंदिराच्या 367 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मशाल महोत्सवात तब्बल 367 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींच्या केशरी प्रकाशाने संपूर्ण गड उजळून निघाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो…

Read Full News

CJI Advice to NLSIU Students at Bengaluru Convocation

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शनिवारी कायद्याच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही कोणाशीही असहमत होऊ शकता; मात्र त्याची प्रतिष्ठा जपा. कोणताही निर्णय देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचेही म्हणणे ऐका. CJI नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU), बंगळुरूच्या ३४व्या वार्षिक दीक्षांत समारंभात सहभागी झाले होते. CJI म्हणाले की, कायद्याचे शिक्षण केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित…

Read Full News