Headlines

'मंगेश चिवटे म्हणजे सचिन सानप' ही टॅग लाइन लक्षात ठेवा:सानप यांच्या प्रचारासाठी चिवटे मैदानात; भाजप उमेदवार कौस्तुभ गावडेंना टोला

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अधिकृत पत्र काढून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी अर्ज मागे घेत आता ते स्वतः सचिन सानप यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले…

Read Full News

'अजितदादांच्या निधनानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले':आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती. जानेवारी महिन्यात त्यांचे अपघाती निधन झाल्याने राजकारणात मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, आगामी अर्थसंकल्पाचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले. सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडे या…

Read Full News

रजनीकांत यांच्या चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार देवा यांचे निधन:75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 400 हून अधिक चित्रपटांना दिले संगीत

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार देवा यांचे शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. देवा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांमधील प्रसिद्ध इंट्रो म्युझिकला आपल्या चालींमुळे खास ओळख मिळवून दिली होती. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील ४०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या निधनामुळे दक्षिण…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या:रोहित पवार म्हणाले, 5 हजारांची मदत क्रूर थट्टा; दिवाळीपूर्वी आंदोलन करणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता हेक्टरी एक लाख रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे…

Read Full News

पुण्यात 500 हून अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन:अडीच कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल गुलदस्त्यात; पुणेकर मंचाचा आरोप

गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील ५०० हून अधिक गणेश मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता असतानाही अद्याप पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे, ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा सविस्तर अहवाल जाहीर केलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई आणि अहवाल प्रसिद्ध करण्यास…

Read Full News

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार व्हावेत:डॉ. दीपक शिकारपूर यांचे दादासाहेब केतकर स्मृतिदिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृहात व्याख्यान

तंत्रज्ञानात वेगाने क्रांती घडत आहे. तंत्रज्ञानाचा वेग कोणीही थांबवू शकत नाही. काळानुरूप बदलते तंत्रज्ञान वाईट नसते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो यावर त्या तंत्रज्ञान, वापरकर्त्याचा लौकिक अवलंबून असतो. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार होण्याची आवश्यकता असून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविल्यास, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिल्यास हेच तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचे भविष्य…

Read Full News

10 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले!:मुलीच्या आईवर कटाचा संशय; गोरेगावातील धक्कादायक घटना

गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 ऑक्टोबरच्या रात्री एका दहा वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून थेट मोकळ्या डक्टमध्ये फेकल्याने त्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने या घटनेमागे मोठा कट…

Read Full News

नागपुरात धक्कादायक प्रकार!:यू-ट्यूब पाहून अल्पवयीन तरुणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, शाळेतील मित्राला अटक; काय आहे प्रकरण?

नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर नागपूरमधील एका शाळेत एकत्र शिकणाऱ्या 18 वर्षीय तरुणाने त्याच्याच शाळेतील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले. यातून ती अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी तरुणाने गर्भपात करण्यासाठी एक भयंकर मार्ग निवडला. त्याने…

Read Full News

जयपूरमध्ये ‘आश्रम-4’चे शूटिंग पूर्ण, बॉबी देओल मुंबईला रवाना:विमानतळावर माध्यमे आणि चाहत्यांचे आभार मानले; पिंकसिटीमध्ये महिनाभर चालले शूटिंग

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल शनिवारी जयपूरहून मुंबईसाठी रवाना झाले. ते गेल्या जवळपास महिनाभरापासून जयपूर आणि आसपासच्या विविध ठिकाणी वेब सीरिज ‘आश्रम ४’चे चित्रीकरण करत होते. या वेळापत्रकात त्यांच्या गाजलेल्या बाबा निराला या व्यक्तिरेखेशी संबंधित दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले. जयपूरसोबतच आमेर, कूकस, खोरा बीसल, बांसखोह आणि दौसा यांसह अनेक ठिकाणी शूटिंग झाले. या काळात बाबा निराला…

Read Full News

SC म्हणाले- इंटरनेटचा वापर हा मुलांचा अधिकार:यापासून पूर्णपणे दूर ठेवणे हास्यास्पद; बंदी घालणे हा ऑनलाइन सुरक्षेचा योग्य मार्ग नाही

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलांना इंटरनेटपासून पूर्णपणे दूर ठेवणे हा ऑनलाइन सुरक्षेचा योग्य मार्ग नाही. मुलांना इंटरनेट वापरण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अशी उपाययोजना केली पाहिजे, ज्यामुळे ते ऑनलाइन धोक्यांपासून सुरक्षित राहू शकतील आणि इंटरनेटचाही वापर करू शकतील. न्यायालयाने मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री ओळखून ती हटवण्यासाठी कडक व्यवस्था उभारण्यावर भर दिला. न्यायमूर्ती…

Read Full News