Headlines

Hyundai Pune Plant Inauguration; Devendra Fadnavis Unveils Mega Project

भारतात आपली 30 वर्षे साजरी करत असताना, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) महाराष्ट्रातील तळेगाव (पुणे) येथील आपल्या अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे अधिकृत उद्घाटन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्लांटचे शा . याप्रसंगी कोरियाचे भारतातील राजदूत ली सेआँग-हो, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ह्युंदाई मोटर ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन ईईसुन चुंग, व्हाईस चेअरमन जेहून…

Read Full News

RM ड्रिप-RB डेनिम्सवर EDची छापेमारी:मुंबईसह 6 शहरांतील 29 ठिकाणांवर छापे, शेअर्समध्ये हेराफेरीमुळे 1 लाख गुंतवणूकदारांचे नुकसान

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दोन सूचीबद्ध कंपन्या M/s RM ड्रिप अँड स्प्रिंकलर्स सिस्टम्स लिमिटेड आणि M/s RB डेनिम्स लिमिटेड यांच्या समभागांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या संस्थेने शुक्रवारी मुंबई, नाशिक, अहमदाबादसह सहा शहरांमधील २९ ठिकाणांवर छापे टाकले. EDच्या तपासात समोर आले आहे की, बनावट व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे दिल्या जाणाऱ्या टिप्सच्या जाळ्यात अडकून १ लाखांहून अधिक किरकोळ…

Read Full News

कृती सेननचे चरणस्पर्श करू लागला चाहता:व्हिडिओ व्हायरल; अक्षय, सनी, सुष्मिता आणि हनी सिंहशी संबंधित असे क्षणही चर्चेत राहिले

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात एक चाहता अचानक तिच्याजवळ येऊन तिच्या पाया पडू लागतो. कृतीने ही परिस्थिती सहजतेने हाताळली. यापूर्वीही सुष्मिता सेन, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, हनी सिंह आणि सनी देओल यांच्याशी संबंधित असे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. कृती सध्या तिच्या आगामी भयपट चित्रपटामुळे आणि रक्षाबंधनच्या जाहिरातीशी संबंधित वादामुळेही…

Read Full News

'ज्ञानतीर्थ-2026' युवक महोत्सवाचा नांदेडमध्ये कलाविष्कार:भारत गणेशपुरे यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

युवकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाला ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या नावाने शुक्रवारपासून (दि. १६) उत्साहात प्रारंभ झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजच्या आयोजनातून होत असलेल्या या चार दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, माजी खासदार डॉ….

Read Full News

मुंबईतील शालेय मुलांसाठी नवी मैदाने आणि सायकल ट्रॅक!:CM देवेंद्र फडणवीसांची विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘सुजाण नागरिक सक्षम भारत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनमूल्यांवर आधारित नव्या नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली आणि शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवत…

Read Full News

नातेवाईक म्हणाले- तोंडात तुळसीचे पान टाकताच जिवंत झाली आजी:गोरखपूरमध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती

गोरखपूरमध्ये मृत घोषित केलेली एक महिला, तिच्या तोंडात तुळशीचे पान ठेवताच जिवंत झाली. गुरुवारी ५६ वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. लाकडे पोहोचली होती आणि नातेवाईकही घरी आले होते. याचदरम्यान कुटुंबीयांनी महिलेच्या तोंडात गंगाजलासोबत तुळशीचे पान ठेवले, तेव्हा तिला खोकला येऊ लागला. हे पाहून कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्यांनी तातडीने महिलेला BRD मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे…

Read Full News

क्रिकेटमधील मानसिक सामर्थ्याचे रहस्य उलगडणार!:बलविंदर सिंग संधूंच्या नव्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

भारताला १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे भारताचे माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांनी लिहिलेल्या ओपन माईंड – द इनर गेम ऑफ क्रिकेट या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात करण्यात येणार आहे. पुण्यातील क्रिकेटचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक पीवायसी हिंदू जिमखाना येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळात पार…

Read Full News

महिलांमध्ये हार्मोन्स बदलांमुळे सांधेदुखीचा त्रास:रजोनिवृत्तीनंतर हाडांची घनता कमी होते; लक्षणांकडे दुर्लक्ष नको, डॉ. सुजित काडरेकर यांचा सल्ला

मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या महिलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. या बदलांचा परिणाम हाडांचे आरोग्य, सांधे आणि शरीरातील सूजेवर होऊ शकतो. त्यामुळे काही महिलांना सांधेदुखी, सांधे आखडणे आणि स्नायू दुखण्याचा त्रास जाणवतो. मात्र, प्रत्येक सांधेदुखीचे कारण हार्मोन्समधील बदल नसून, त्यामागे संधिवात किंवा इतर आजारही असू शकतात. त्यामुळे सततच्या वेदनांकडे दुर्लक्ष…

Read Full News

डॉ. कलाम यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशन:धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे राष्ट्रपती होते डॉ. कलाम- डॉ. सबनीस

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे धार्मिक कर्मकांड मानणारे नव्हते, मात्र धर्मवादी विचारांचे होते. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. जगात पहिल्यांदाच देशाला संशोधक राष्ट्रपती लाभले. राष्ट्रपतीपदावर असतानाही त्यांनी विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि सैनिकांशी थेट संवाद साधला. सूर्याप्रमाणे आपल्या कार्यासाठी सदैव तळपत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. कलाम, असे मत…

Read Full News

केंद्राचा दावा- CM मान यांना कट्टरपंथीयांकडून धोका:फ्रान्समधील गर्दीच्या कार्यक्रमात सुरक्षेची अडचण; उच्च न्यायालयाने दौऱ्याला मंजुरी दिली

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या फ्रान्स दौऱ्याला मंजुरी दिली आहे. तसेच न्यायालयाने केंद्र सरकारने मंजुरी देण्यास नकार दिल्याचा आदेशही रद्द केला आहे. पंजाब सरकारने केंद्राच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. भगवंत मान यांना मार्कफेडच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान पॅरिसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय…

Read Full News