विधान परिषदेच्या 5 पैकी 4 जागांवर बंडखोरीचे महायुतीपुढे मोठे आव्हान:महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्याने लढत रंगणार
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ आॅक्टोबरला मतदान होत आहे. त्यातील ४ जागांवर महायुतीत बंडखोरी झाल्याने अधिकृत उमेदवार संकटात सापडले आहेत. विशेषत: पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘नाशिक पॅटर्न’ राबवला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे शक्ती उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) नरेंद्र दराडे पराभूत झाले होते….