112 वा जन्मोत्सव उत्साहात:ललिता पंचमीनिमित्ताने बोरदहेगाव येथे जनार्दन स्वामींच्या पालखीची मिरवणूक
वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव ललिता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडला. जनार्दन स्वामी महाराज यांच्या या पावन जन्मभूमीत उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ललिता पंचमी जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनार्दन स्वामी महाराज यांच्या जन्मभूमी…