वाळू पकडण्यासाठी गेलेल्या पथकाच्या अंगावर हायवा घालण्याचा केला प्रयत्न:पेंडगाव शिवारातील घटना: चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा अडवून कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल पथकाच्या अंगावर हायवा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री पेंडगाव शिवारात घडली. या वेळी सहा ब्रास वाळूसह हायवा पळवून नेण्यात आला असून, या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ग्राम महसूल अधिकारी विशाल अशोक दुनगहु आणि…