Headlines

पाण्यासाठी झरेकर रस्त्यावर; पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न:सोडलेले पाणी बंद‎केल्याने आंदोलन पेटले‎

करमाळा तालुक्यातील झरे गावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे आणि गावातील तलाव भरून द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी महिलांसह अहिल्यानगर- टेंभुर्णी महामार्गावरील खडकेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी झरे येथील शेतकरी दादासाहेब घाडगे पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले. यंदा…

Read Full News

नवरात्रोत्सव‎:तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने दुमदुमली पाथर्डी नगरी

हळद-कुंकवाची मुक्त उधळण, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी आणि तुळजाभवानी माता की जय या जयघोषात भाविक भक्तिरंगात न्हाऊन निघाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची ऐतिहासिक व मानाची पालखी चौथ्या माळेनिमित्त बुधवारी शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनाने शहरवासीयांसह भाविक भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी झालेली स्वागताची तयारी, महिलांनी केलेले औक्षण, खणानारळाने भरलेली ओटी आणि रांगोळ्यांनी पालखी…

Read Full News

मैत्रीच्या विश्वासाचा घात:जंगलात नेऊन मित्राची गोळ्या झाडून हत्या

मैत्रीच्या नात्यात विश्वासघात करीत दोन मित्रांनीच तिसऱ्या मित्राची गावठी बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील पेढेवाडी शिवारात उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भोरू सोमा कातोरे (वय ३२, रा. दगडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी धोंडू सोमा पथवे (रा. दगडवाडी) आणि…

Read Full News

अहिल्यानगर:बिल्डरने फसवणूक केल्याच्या नैराश्यातून घेतला गळफास

येथील वैद्य कॉलनीमध्ये घर घेण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याने व बिल्डरने फसवणूक केल्याच्या नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवला आहे. प्रथमेश आनंदा धिवर (वय २९, रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून बिल्डर तबरेज अकबर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मयत आनंदा…

Read Full News

गाढेजळगावच्या डोंगरावर 9 दिवस महिला भाविकांचा मुक्काम:श्री रेणुकामातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविकांची मांदियाळी

करमाडपासून पूर्वेला सुमारे सहा किलोमीटर अंतरावर गाढेजळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत श्री रेणुकामातेचे अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर वसलेले आहे. पंचक्रोशीतील २५ ते ३० गावांतील हजारो भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात सध्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सुमारे ७५० वर्षांहून अधिक काळापासून देवीची स्वयंभू मूर्ती येथे विराजमान असल्याचे…

Read Full News

नागापूर‎:दशावतारी सोंगांचा कार्यक्रम; मुस्लिम बांधवांना निमंत्रण

येथे नवरात्रोत्सवानिमित्त पूर्णेश्वर संस्थान व चंडिका माता संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रात्री ९ वाजता पूर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने दशावतारी सोंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मशिदींचे हाफिज साहेब तसेच मुस्लिम बांधवांना संस्थानतर्फे निमंत्रण देण्यात आले असून, या उपक्रमातून गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपण्याचा आदर्श संदेश देण्यात आला…

Read Full News

हमीभावात 500 रुपयांची वाढ:पैठणमध्ये 21 ऑक्टोबरपासून शासकीय कापूस खरेदी; बाजारात 9 हजारांचा भाव

यंदा पैठण तालुक्यात ओढावलेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि मान्सूनच्या पावसातील दीर्घ खंडामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. प्रतिकूल हवामान, जमिनीतील पाण्याची घटलेली पातळी आणि वाढता उष्णतेचा पारा या सर्वांचा मोठा फटका कापूस पिकाला बसला असून, एकूण उत्पादनात निम्म्याहून अधिक घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेहमीप्रमाणे दोन ते तीन टप्प्यांत होणारी…

Read Full News

गव्हाली‎:गव्हाली परिसरात अवैध पाणी उपशावर प्रशासनाची कारवाई

अत्यल्प पर्जन्यमानामुळे पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गव्हाली, तलवाडा, तांडा बाजार, बोरगाव कासरी आणि निल्लोड या लघु प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा वेगाने खालावत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उभी पिके वाचवण्यासाठी नद्या, तलाव, लघु प्रकल्प व बॅरेजमधून थेट पाइप टाकून विद्युत मोटारींद्वारे अनधिकृत पाणी उपसा मोठ्या प्रमाणात…

Read Full News

दिंडोरी‎:बस प्रवासात वृद्ध महिलेचे 80 हजारांचे दागिने लंपास

वलखेड फाटा ते दिंडोरी बस प्रवासादरम्यान एका वृद्ध महिलेच्या पिशवीतून ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभागा जयराम घुले (रा. मुळाणे पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर) या दुपारी वलखेड फाटा ते दिंडोरी प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील ६०…

Read Full News

वणी‎:दिंडोरीतील परिस्थितीचा आढावा घेऊन तालुका लवकर दुष्काळी जाहीर होणार

अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, दिंडोरी तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर होण्याची शक्यता आहे. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. तिसगाव धरण जलपूजन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत…

Read Full News