Headlines

चांदवड:दरसवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दुभत्या गाईचा मृत्यू

तालुक्यातील दरसवाडी (हिरापूर) शिवारातील कांगुणे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गोठ्यातील दुभती गाय ठार झाली. या प्रकाराने परिसरातील शेतकरी व पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. हिरापूर येथील कांगुणे वस्तीवरील शेतकरी सागर कांगुणे यांच्या घराजवळ बांधलेल्या दुभत्या गाईवर रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने…

Read Full News

उपक्रम:सुभाषनगरला लोणजाई माता गडावर 2,500 महिलांचे दुर्गा सप्तशतीपाठ

विंचूरजवळील सुभाषनगर येथील श्री क्षेत्र लोणजाई माता गडावर गुरुवारी (दि. १५) तालुकास्तरीय श्री दुर्गा सप्तशती सामुदायिक पाठवाचन सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. या सोहळ्यात साधारण २,५०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आजच्या धावपळीच्या जीवनात कुलदेवतेची उपासना व सेवा यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संकेतांतून प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे…

Read Full News

बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्या; कन्नडमध्ये 24 विद्यार्थ्यांना विषबाधा:तीन मुलांची प्रकृती गंभीर, हिवरखेडा-गौताळा रस्त्यावरील मदरशामध्ये घडली घटना‎

हिवरखेडा गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथील २४ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एरंडाच्या बिया बदाम समजून खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. या घटनेत २४ मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ मुलांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी फैजान शेख युसूफ, समीर मोहम्मद अन्सारी, नेहाल शेख नईमुद्दीन, फरान शेख युसूफ, तोहित…

Read Full News

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्यासह दोघे गंभीर:कसबे सुकेणे येथील घटना; नागरिकांमध्ये भीती‎

कसबे सुकेणे गाव व परिसरात गुरुवारी (दि.१५) पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलासह दोघांवर गंभीर हल्ला केल्याची घटना घडली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी दिवसभरात या कुत्र्याच्या हल्ल्यात आदेश शार्दूल आणि रेल्वे स्टेशनवर काम करणारी आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, परिसरातील एका महिलेवरही कुत्र्याने हल्ला…

Read Full News

ISRO Gaganyaan Mission Launch Update; Crew Module Test Success at VSSC

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इस्रोने गगनयान कार्यक्रमातील क्रू मॉड्यूल (CM) आणि सर्व्हिस मॉड्यूल (SM) वेगळे करणाऱ्या प्रणालीची चाचणी पूर्ण केली आहे. यानंतर या प्रणालीच्या डिझाइन क्षमतेची पुष्टी झाली आहे. या चाचण्या तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे घेण्यात आल्या. गगनयानचे पहिले मानवरहित मिशन G1 वर्ष 2026 मध्ये प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे. पहिल्या ‘ह्यूमन-रेटेड…

Read Full News

तळेगाव, कातरणी शिवारात तरसाचा 3 दिवसांपासून वावर:शेतकरी भयभीत, मका काढणीची कामे सुरू असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर‎

चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव, कातरणी शिवारात सलग तीन दिवसांपासून तरस दिसत असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सध्या शेतांमध्ये मका काढणीची कामे सुरू असून, तरसाचा दिवसा वावर आढळत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव, कातरणी परिसरातील शेतकरी विक्रम हरिभाऊ वाकचौरे यांना…

Read Full News

सलमान खानसाठी मुलगी शोधण्यावर अर्जुन बिजलानी म्हणाला:हे कठीणच नाही, तर अशक्य; सांगितले अविवाहित राहण्याचे फायदे

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्यांची पत्नी नेहा स्वामी रिअॅलिटी शो ‘धमाल विद पती, पत्नी और पंगा सीजन 2’मध्ये दिसत आहेत. दैनिक दिव्य मराठीशी बातचीत करताना अर्जुनने सलमान खानसाठी मुलगी शोधण्याबाबत मिश्कील अंदाजात म्हटले की, हे काम केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. अर्जुन आणि नेहा यांनी सिंगल राहण्याचे फायदे तसेच वैवाहिक जीवनातील आव्हानांवरही मोकळेपणाने…

Read Full News

चांदवड‎:बंदोबस्तासाठी जात असताना हवालदाराचा अपघातात मृत्यू

नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर जात असताना स्कुटीला झालेल्या अपघातात चांदवड पोलिस ठाण्यातील हवालदार राजेंद्र किसन माळी (४९, रा. चांदवड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास राजेंद्र माळी हे स्कुटीने पोलिस ठाण्याच्या आवारातून बाजारपेठेच्या दिशेने नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जात होते. पोलिस ठाण्याजवळील संघाच्या कार्यालयासमोर त्यांच्या स्कुटीचा अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर…

Read Full News

यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचा वागदर्डी धरणात बैल धुताना बुडून मृत्यू:नाशिक जिल्ह्यात डोणगावची घटना; दिल्लीहून दोन दिवसांपूर्वीच परतला गावी

यूपीएससीद्वारे प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या डोणगाव (ता. चांदवड) येथील राहुल बाळासाहेब सोमासे (२४) याचा मित्रासाेबत त्याचा बैल धुण्यासाठी गेलेला असताना वागदर्डी धरणात बुडून मृत्यू झाला. ताे एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका आणि काकू असा परिवार आहे. पदवीनंतर ताे यूपीएससी तयारीसाठी तीन वर्षांपूर्वी दिल्लीला गेला. बुधवारी रात्री उशिरा तो घरी आला….

Read Full News

RSS महिला शाखा प्रमुख म्हणाल्या- बौद्धिक नक्षलवाद विषारी विचारांची परिसंस्था:Gen Z चा ब्रेनवॉश सुरू; जंतरमंतरवरील आंदोलने अराजकता पसरवत आहेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताकुमारी यांनी जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, या मुद्द्यामुळे भारतात मोठी अस्थिरता निर्माण होत आहे. शांताक्का यांनी दावा केला की, ‘मानसिक नक्षलवाद’ (बौद्धिक नक्षलवाद) हा विषारी विचारांची सर्वांत धोकादायक आणि अदृश्य परिसंस्था आहे. तो जेन झेडचे ब्रेनवॉश करत आहे. महिलांच्या…

Read Full News