Headlines

जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत न्यायालयीन निर्णयाचा परिणाम:महाबळेश्वरकडे राजकीय नजरा; 21 ऑक्टोबरच्या माघारीपर्यंत घडामोडींना वेग

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत न्यायालयीन घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, उमेदवारी टिकविण्यापासून संभाव्य माघारीपर्यंतच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल शिवाजीराव देसाई आणि राजेंद्र ऊर्फ राजूशेठ राजपुरे यांच्याशी संबंधित विशेष अनुमती याचिका फेटाळल्याने निवडणुकीतील पुढील रणनीतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य लढत आणि सोसायटी मतदारसंघातील उमेदवारी माघारीमुळे…

Read Full News

उपचार घेऊन घरी परतताना कार नदीत कोसळली:पत्नीचा बुडून मृत्यू, पतीने पोहत वाचवला जीव; मन्याड नदीवरील दुर्घटना

नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन पत्नीसमवेत घरी परतत असताना बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून टाटा पंच कार नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०, रा. सावरगाववाडी, ता. मुखेड) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांचे पती लक्ष्मण संभाजी गुट्टे (वय ५०) यांनी पोहत नदीपात्राबाहेर येत आपला जीव वाचवला. गुरुवारी (दि. १५…

Read Full News

लिंक-ओटीपी नसतानाही बँक खात्यातून 9.88 कोटी गायब:वकिलासह सहा आरोपींना अटक, तपासात हजारो बँक खात्यांचे जाळे उघड

नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. कोणतीही लिंक डाउनलोड न करता किंवा ओटीपी न देता एका बँक खात्यातून तब्बल ९.८८ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे गायब झाले होते. या प्रकरणी एका वकिलासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वडोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेचा तपास करताना पोलिसांना मोठे आर्थिक जाळे सापडले. तपासात एक…

Read Full News

सध्याची मदत ही केवळ दिवाळीची भेट:आगामी काळात आणखी मदत मिळणार; पंकजा मुंडेंचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली सध्याची मदत ही केवळ दिवाळीपुरती भेट असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य जालन्याच्या पालकमंत्री आणि दुष्काळ निवारण समितीच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी आहे, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी थेट मदत, पीक विमा आणि केंद्राकडे दुष्काळ निवारणाचा अहवाल गेल्यानंतर मिळणारा निधी…

Read Full News

सशस्त्र दलातील दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'वायडी-वन' उपक्रम:तंत्रज्ञानाच्या मदतीने गतिशीलतेला बळ, IIT मद्राससह अनेक संस्थांचा सहभाग

सशस्त्र दलातील दिव्यांग जवान आणि माजी सैनिकांना अधिक स्वावलंबी, सक्षम आणि सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने ‘वायडी-वन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि विविध संस्थांमधील सहकार्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन अधिक प्रभावी करण्यावर या उपक्रमाचा भर आहे. विशेषतः हालचालींमध्ये अडचणी असलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा यामागील प्रयत्न आहे….

Read Full News

जलसंकटावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छतेवर भर:सिंबायोसिसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मत, ‘इकोसॅन इन प्रॅक्टिस’ पुस्तकाचे प्रकाशन

वाढते जलसंकट, जलप्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छता, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि संसाधनांचे पुनर्प्राप्तीकरण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असा सूर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत उमटला. शहरी जलव्यवस्थापनात निसर्गकेंद्री दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहनही तज्ज्ञांनी केले. ‘चक्रीय अर्थव्यवस्थेपासून पर्यावरणपूरक स्वच्छतेकडे : शहरी जलव्यवस्थेत निसर्गाला केंद्रस्थानी आणणे’ या विषयावर लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात…

Read Full News

गणेशोत्सवात दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश:पुणे पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 13 गुन्हे उघड केले

गणेशोत्सवाच्या गर्दीत भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. एका आरोपीला अटक करून १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाइल, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सोनसाखळी व मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. विजयपाल कवर…

Read Full News

'मनोरा' आमदार निवासाचे काम वेळेआधीच पूर्ण करा:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे निर्देश

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्रालयातील नवीन इमारत तसेच एअर इंडिया इमारतीच्या कामकाजाचाही आढावा घेऊन सर्व कामे दिलेल्या वेळेत व दर्जेदार करण्याचे निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, सचिव…

Read Full News

नांदेडमध्ये 29.17 लाखांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त:‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत 32 आस्थापनांची तपासणी

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून 32 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत भेसळीचा संशय असलेली मिरची पूड, हळद पूड, धने पूड आणि मीठ असा एकूण 25 हजार 832 किलो…

Read Full News

MPSC Exam Controversy; Vivek Bhimanwar On Leave, Satish Waghole Takes Charge

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या गैरप्रकारामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग 10 . दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. राज्य सरकारने या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी…

Read Full News