पुणे जिल्ह्यात 80 टक्के पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण:दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, रविवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पीक नुकसानीचे…