उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात डोक्यात दोन गोळ्या झाडून कोयत्यानेही वार:हरीश गजवानी यांची 27 सप्टेंबरची जुनी पोस्ट चर्चेत, 24 तासांत तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
ठाणे जिल्ह्यात गोळीबार आणि हत्येच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मानपाडा परिसरात शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये प्रसिद्ध युट्यूबर हरीश गजवानी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. गजबजलेल्या उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानेही वार करण्यात आल्याची माहिती आहे….