Headlines

इंडिया आघाडीचा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा:फॉर्म सहामधील बदलांना विरोध, एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

नांदगाव खंडेश्वर येथे इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला. फॉर्म सहामधील बदल व एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी गुरुवारी तहसील कार्यालयावर केली. काँग्रेस नेते प्रा. विरेंद्र जगताप व भाकप नेते कॉ. तुकाराम भस्मे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. बसस्थानकापासून सुरू झालेल्या आंदोलनात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी…

Read Full News

अमरावती-बडनेरा जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण:मोर्शीजवळच्या गळतीमुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा शुक्रवारपासून नियमित मिळेल

अमरावती आणि बडनेरा उपनगराचा बुधवारपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा शुक्रवार, १६ ऑक्टोबरपासून पूर्ववत होईल. मोर्शी तालुक्यातील निंभीजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने हा पुरवठा थांबला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) युद्धपातळीवर दुरुस्ती केली. गुरुवारी पहाटे जलवाहिनी पूर्ववत झाली. त्यानंतर चाचणी घेऊन गुरुवारी सायंकाळी शहराच्या काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला. मजीप्रा अधिकाऱ्यांनुसार, बुधवारचा पाणीपुरवठा बंद असलेल्या लोअर…

Read Full News

एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे:राज्यातील सहा विभागांसाठी 9.76 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, माधुरी मिसाळ यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीय व्यक्तींना सन्मानाने आणि सुरक्षितपणे वावरता यावे, तसेच प्रवासादरम्यान त्यांना स्वच्छतागृहांअभावी होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधांच्या उभारणीसाठी राज्य सरकारने 9 कोटी 76 लाख 63 हजार 195 रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली…

Read Full News

Amazon Great Indian Festival Pune Leads; Maharashtra Sales Surge

ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दोन दिवसांत Amazon.in वर ४४ कोटींहून अधिक भेटींची नोंद झाली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद असल्याचा दावा ॲमेझॉनने केला आहे. या खरेदी उत्सवा . ॲमेझॉन बाजारच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या मंचावर प्रथमच खरेदी करणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या पुण्यात नोंदवण्यात आली आहे. पुण्यात…

Read Full News

एमएस-सेट परीक्षा 25ऑक्टोबरला होणार:अमरावतीत 9816 विद्यार्थी 32 केंद्रांवर देणार परीक्षा; दिव्यांग विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे एमएस-सेट परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागांतर्गत ही परीक्षा अमरावती शहरात घेतली जात आहे. यासाठी एकूण ३२ केंद्र निश्चित करण्यात आली असून, ९ हजार ८१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रांमध्ये शहरातील विविध महाविद्यालये आणि शाळांचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी…

Read Full News

शेतात विद्युत तारेचा धक्का लागून 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू:कुऱ्हा येथील जामठी शेत शिवारात घडली घटना, परिसरात शोककळा

कुऱ्हा येथील जामठी शेत शिवारात गुरुवारी सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. निलेश शामसुंदर सुजिया असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. निलेश शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. सकाळी त्यांनी विद्युत प्रवाह बंद…

Read Full News

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा; आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन:अमरावतीत जिल्हा परिषदेसमोर धरणे, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अमरावतीत आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. शुक्रवार, १६ ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन आणि धरणे दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये करार पद्धत बंद करून सेवेत कायम करणे, तसेच वेळेवर मानधन देणे यांचा समावेश आहे. केआरएसाठी मानसिक छळ…

Read Full News

अमरावती एडीसीसी बँकेच्या निवडणुकीची अंतिम यादी जाहीर:26 ऑक्टोबरच्या आसपास निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, 10 दिवसांची मुदत

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा २६ ऑक्टोबरच्या आसपास केली जाईल. नियोजित वेळापत्रकानुसार, १४ ऑक्टोबरला एडीसीसीच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर १० ते २० दिवसांच्या आत निवडणुकीची घोषणा करण्याची कायद्यात तरतूद आहे. यानुसार, विभागीय सहनिबंधक कार्यालय कामाला लागले आहे. सूत्रांनुसार, साधारणपणे १२ दिवसांनंतर म्हणजेच २६ ऑक्टोबरच्या आसपास निवडणुकीचा…

Read Full News

'रामायण'चा दुसरा ट्रेलर रिलीज:पूर्वीपेक्षा अधिक चांगले दिसले VFX आणि वेशभूषा; रावण-इंद्र आणि जटायू युद्धाचे सीन दाखवले

रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 मिनिटे 36 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये पहिल्या ट्रेलरच्या तुलनेत VFX आणि पात्रांच्या वेशभूषेत सुधारणा करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये भगवान राम (रणबीर कपूर) आणि रावण (यश) यांच्यातील धर्म-अधर्माच्या युद्धावर केंद्रस्थानी भर देण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात एका व्हॉइसओव्हरने होते, ज्यामध्ये अंधाराच्या गर्तेतून रावणाचा उदय कसा…

Read Full News

जामखेडमध्ये चहाच्या टपरीवर युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला:मनगटापासून हात वेगळा, 3 हल्लेखोर फरार

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामखेड-नगर रस्त्यावरील पुढारी वड परिसरात चहाच्या दुकानात बसलेल्या एका युवकावर 3 अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात राहुल अंधारे (वय 34) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हातावर केलेला वार इतका गंभीर होता की, त्यांचा हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला. बुधवारी सायंकाळी…

Read Full News