चोरटे सीसीटीव्हीत कैद:पाचोडच्या जय भवानी हॉटेलमधून 36 हजार रुपयांची दारू पळवली, पाचोड पोलिसांकडून तपासाला वेग
पाचोड परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बीड रोडवरील जय भवानी हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हॉटेलमधून देशी दारूचा ३६ हजार रुपयांचा साठा आणि किराणा माल लंपास केला. पाचोड येथील प्रतीक अंबादास नरवडे यांचे बीड रोडवरील राष्ट्रीय महामार्गालगत जय भवानी बिअर बार व…